Bjp: इच्छुकांच्या गर्दीमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, नेत्यांचा गावागावात एकत्रित बैठकांचा सपाटा

Latest marathwada news: विधानसभेसाठी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Devendra Fadanvis:  होरिबाने बुटीबोरीत सेमिकंडक्टर प्रकल्प सुरू करावा: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis Nashik Dauraesakal
Updated on

latest Phulambri news: फुलंब्री विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवार भाजपात असल्यामुळे पक्षाचे डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल आठ जण इच्छुकाच्या शर्यतीत असल्याने एकमेकाची कोंडी करण्यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांची भावी गर्दी झाल्याने वरिष्ठ नेत्यांच्या तंबीनंतर इच्छुक उमेदवारानी एकत्रित येऊन गावागावात बैठकाचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून फुलंब्री विधानसभेसाठी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे पारंपारिक राजकीय विरोधक असणारे हरिभाऊ बागडे यांची राजस्थान येथे राज्यपाल पदी वर्णी लागली. तर त्यांची राजकीय विरोधक असलेले माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांची जालना लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवड झाली.

Devendra Fadanvis:  होरिबाने बुटीबोरीत सेमिकंडक्टर प्रकल्प सुरू करावा: देवेंद्र फडणवीस
इंदोरीत भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

त्यामुळे दोन्ही आजी माजी आमदार मतदार संघाच्या बाहेर पडल्यामुळे दोन्ही बाजूने नवीन चेहरा दिला जाणार आहे. भाजपकडून सर्वाधिक इच्छुक असल्याने याचा फटका पक्षाला बसू नये म्हणून वरिष्ठांच्या तंबीवरून सर्वस इच्छुक एकत्रित बैठका घेऊन पक्षाचे संघटन वाढवीत आहे.

सुरुवातीला यांनी आपापली वेगळी चूल मांडली होती. मात्र वरिष्ठ नेत्याच्या आदेशावरून पुन्हा सर्वच इच्छुक एकाच छताखाली येऊन बैठकांचा सपाटा घेऊ लागले आहे. या बैठकांच्या सपाटात शरीराने एकत्र आले असले तरी मनाने सर्वजण दुभागलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जो तो आपापल्या पद्धतीने जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचे काम करू लागला आहे. फुलंब्री शहरासह तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करून विविध सण, वाढदिवस आदींचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असणारा प्रत्येक जण उमेदवारी मलाच मिळणार असल्याचे खाजगीत बोलत आहे.

.....

Devendra Fadanvis:  होरिबाने बुटीबोरीत सेमिकंडक्टर प्रकल्प सुरू करावा: देवेंद्र फडणवीस
Marathwada: दोन्ही अपंग मुलींना शिकविण्याची हाकीम कुटुंबाची धडपड सुरू

इच्छुकांना सबुरीने घेण्याचा सल्ला

इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे पक्षांतर्गत वाद उफाळून आल्यास याचा फटका भाजपलाही बसू शकतो. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध रीतीने पाऊल टाकीत सर्वच इच्छुकांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. असे असले तरी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच पक्षांतर्गत असलेला वाद थांबविण्यात भाजपला यश मिळणार का..? हे आगामी काळातच दिसून येणार आहे.

.भाजपकडून इच्छुक उमेदवार

फुलंब्री बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष रामू काका शेळके, माजी उपमहापौर विजय औताडे, जिल्हा महामंत्री राजेंद्र साबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे.

Devendra Fadanvis:  होरिबाने बुटीबोरीत सेमिकंडक्टर प्रकल्प सुरू करावा: देवेंद्र फडणवीस
BJP MLA fell on track: भाजपची महिला आमदार थोडक्यात बचावली, गर्दीत धक्का बसला अन् थेट रेल्वे रुळावर पडली; Video

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.