आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. ५८ मूकमोर्चे काढले तरी आरक्षण मिळाले नाही. आता पुन्हा काही स्वयंघोषित नेते पुढे पुढे करीत आहेत. छावा संघटनेची पहिल्यापासूनच ठोक भूमिका राहिली आहे.
लातूर : मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation ५८ मूक मोर्चे काढून काहीही फायदा झाला नाही. पण, समाजाचा वापर करून कोणी खासदारकी, कोणी आमदारकी तर कोणी महामंडळे मिळवून विश्वासघात केला आहे. स्वार्थी राजकारण सुरू आहे. छत्रपती संभाजीराजेंनी Chhatrapati Sambhajiraje मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. आरक्षणाची भूमिका बाजूला ठेवून राजे आज सारथी संस्थेला, महामंडळाला निधीची मागणी करीत आहेत. मूक आंदोलन करीत आहेत. मराठा समाजासाठी आता ठोक आंदोलन असेल. लवकरच महाराष्ट्रात आरक्षणासाठी उद्रेक दिसेल, अशी माहिती अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे Akhil Bhartiya Chhawa Maratha Yuva Sanghatana केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे Nanasaheb Jawale यांनी मंगळवारी (ता.२२) येथे पत्रकार परिषदेत दिली. श्री.जावळे म्हणाले, आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. ५८ मूकमोर्चे काढले तरी आरक्षण मिळाले नाही. आता पुन्हा काही स्वयंघोषित नेते पुढे पुढे करीत आहेत. छावा संघटनेची पहिल्यापासूनच ठोक भूमिका राहिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांना आमचा विरोध नाही. पण, त्यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध आहे. ते आरक्षणावर बोलत नाहीत. पण, सारथी संस्थेला व महामंडळाला निधी देण्याची भाषा बोलत आहेत. राजेंनी आमच्यासारखी ठोक भूमिका घ्यावी. आमच्यासाठी शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत. दुसरे राजे नाहीत, असेही श्री. जावळे म्हणाले. यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, भीमराव मराठे, भगवान माकणे, माधव गंभिरे, मराठा महासंग्रामचे राजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते. Sambhajiraje's Stand On Maratha Reservation Not Acceptable Latur Updates
ठाकरे, चव्हाणांकडून समाज वाऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray आरक्षणावर बोलत नाहीत. पण, बंद दाराआड मात्र चर्चा करतात. आरक्षणाच्या नावाखाली नेत्यांची स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयात बाजू मांडण्यास राज्य शासन कमी पडले आहे. श्री. ठाकरे, अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आमची लढाई आहे. आरक्षण नसल्याने समाजाचे मोठे नुकसान होत आहे. शांततेच्या मार्गाने मागण्या होत नाही हे आतापर्यंत पाहिले आहे. लवकरच महाराष्ट्रात Maharashtra या प्रश्नावर उद्रेक दिसेल. मराठा समाजाच्या २५ संघटना आमच्या सोबत आहेत, त्याची ताकद आम्ही दाखवून देऊ, असा इशारा असे श्री. जावळे यांनी यावेळी दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.