Samurdhi Mahamarg : हर्सूल सावंगी जवळ ट्रक-खुराणा ट्रॅव्हल्सची धडक... समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच!

हर्सूल सावंगी जवळ ट्रक-खुराणा ट्रॅव्हल्सची धडक
accident
accident sakal
Updated on

विकास देशमुख

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास येथील हर्सूल सावंगी येथील गेट क्रमांक 16 जवळ खुराणा ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस आणि ट्रकची धडक झाली. यात बसचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत 20 प्रवासी जखमी झाले.

सुदैवाने यात कुणाला गंभीर इजा झाली नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जखमींपैकी नऊ जणांवर प्राथमिक उपचार करून करून त्यांना घरी सोडण्यात आले. उर्वरित 11 जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) उपचार सुरू आहेत.

समृद्धी महामार्गावर दर दोन-तीन दिवसाला कुठे ना कुठे अपघात होत आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाले. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत अपघात झाले. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक ट्रक आणि बसची धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की परिसरामध्ये मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

accident
Accident News : करंजी-वणी मार्गावर वृत्तपत्राच्या वाहनाला ट्रकची धडक; चार ठार

आवाज ऐकताच नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जखमी 20 जणांपैकी नऊ जणांना किरकोळ मार लागला होता‌. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. उर्वरित 11 जणांवर उपचार सुरू आहेत.

accident
Nashik Bus Accident News : सप्तश्रृंगी गड घाटात 'एसटी' बस दरीत कोसळली; एका महिलेचा मृत्यू, २3 जखमी

नागपूरवरून येत होती बस

अपघातग्रस्त बस ही नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. येथील हर्सूल सावंगी येथील गेट क्रमांक 16 जवळ खुराणा ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस आणि ट्रकची धडक झाली. यात बससह ट्रकचेही मोठे नुकसान झाले.

‌..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.