नांदेड : नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांनी गोदावरी, आसना, लेंडी, मांजरा या नद्या ओरबडून काढल्या आहेत. या बाबीकडे महसुल व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाळू माफियांची हिम्मत वाढली आहे. कारवाईसाठी गेलेल्या महसुल पथकावर अनेकवेळा जिल्ह्यात हल्ले झाले आहेत. त्यामुळे वाळू माफियांवर कारवाई करण्यास महसुलपथक पुढे येत सल्याचे दिसते. तरीसुद्धा महसुल व पोलिस विभाग या कारवाया करीत असतात.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार डॉ. अरुण ज-हाड यांनी कामठा खू. येथील नदीपात्राजवळ अचानक पथकासह धाड टाकून अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करणाऱ्या वाहनांना जप्त केले.
वाहन मालक संतोष गणपराव आवातीरक (MH-04-BV-3176), वाहन मालक कलीम मुल्ला (MH-26-B-3330), वाहन मालक मो.नविद (MH-26-B-4952) आणि वाहन मालक ईम्रानखॉ मंजूर अली खॉन (MH-25-7962) हे वाहने आढळून आल्याने वाहने पकडून तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले. या कारवाई नंतर तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी नांदेड ग्रामीण चंद्रकांत कंगळे यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून वरील चारही वाहन मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नदीपात्राजवळ अचानक पथकासह धाड
तसेच त्यांनी ब्राम्हणवाडा येथील नदीपात्राजवळ अचानक पथकासह धाड टाकून अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करीत असताना वाहन मालक विलास भारती (MH-20AT-4847)आणि (MH-26-B-4847) यां वाहनावर कारवाई नंतर तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी नांदेड ग्रामीण चंद्रकांत कंगळे यांनी मुदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
लिंबगाव ठाण्याच्या हद्दीतही अवैध वाळू उपसा
हस्सापूर येथील नदीपात्रात अचानक रात्री अकरा वाजता पथकासह धाड टाकून अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करीत असताना वाहन वाहन मालक अब्दूल कदीर शेख (MH-04-FP-1478), वाहन मालक सय्यद अन्वर सय्यद अफसर (MH-17-AG-1824), वाहन मालक महमद अझरुद्वीन (MH-04-FD-9133) व ईतर अज्ञात दोन वाहने जप्त करण्यात आली आहे. व त्यातील दोन अज्ञात वाहने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पथकाला गुंगारा देवून फरार झाले. परंतु वाहन ताब्यात घेतल्यावर चालकांचे मोबाईल पथकाने जप्त केले होते. सदर वाहन चालक मोबाईल पथकाजवळ मोबाईल सोडून वाहने घेऊन फरार झाले. सदर कारवाई करत असतांना त्याठिकाणी एक मोटर सायकल आढळून आली.
कारवाईनंतर तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी वजीरबाद अनिल धुळगंडे यानी लिंबगांव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.