MNS: मनसेचा तिसरा उमेदवार जाहीर; लातूर ग्रामीणमधून राज ठाकरेंनी या नेत्याला दिली संधी

Santhosh Nagargoje nominated for Latur Rural seat From MNS: याआधी मनसेने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. एकंदरीत, मनसेचे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असं म्हणावं लागेल.
Raj Thackeray MNS
Raj Thackeray MNS
Updated on

Latur News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी मनसेने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. एकंदरीत, मनसेचे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असं म्हणावं लागेल. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मनसेकडून यापूर्वी अधिकृतपणे दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही नेते राज ठाकरे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक आहेत.

Raj Thackeray MNS
MNS Dilip Dhotre: मनसेच्या स्थापनेपासून सोबत... राज ठाकरेंचे कट्टर समर्थक दिलीप धोत्रे कोण? पंढरपुरमधून मिळालीये उमेदवारी

वरळी विधानसभेमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याबाबत राज ठाकरे यांनी सकारात्मक संकेत दिले होते. आता चौथा उमेदवार देखील मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे. लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांचं नाव निश्चित झालं आहे. संतोष नागरगोजे हे लातूरमधील मनसे पक्षाचे प्रमुख नेते आहेत.

मनसेच्या ३ उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांनी केली

१. मुंबई शिवडी येथून बाळा नांदगावकर

2. पंढरपूर येथून दिलीप बापू धोत्रे

3. लातूर ग्रामीण मधून संतोष नागर गोजे

Raj Thackeray MNS
Amol Mitkari Vs MNS: 'बायकोची नोकरी वाचवण्यासाठी अजित पवारांची...'; मनसेचा दादांच्या प्रवक्त्यावर बोचरा वार

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेला देखील ते महायुतीसोबत लढण्याची शक्यता होती. पण, त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात स्वातंत्र्य लढवणार असल्याची घोषणा केली. मनसे राज्यातील २२५ जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होणार आहे. मनसे देखील चांगली टक्कर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकर हे देखील स्वतंत्र लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळी विधानसभेमध्ये रंगत येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.