Satyashodhak Samaj : सत्यशोधक चळवळीची मोठी हानी! ज्येष्ठ विचारवंत जी‌. ए. उगले यांचे Cancer ने निधन

प्रा. उगले गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक साहित्याचे आणि चळवळीचे संशोधन करीत होते.
GA Ugale Passed Away
GA Ugale Passed Awayesakal
Updated on
Summary

गेवराई (जि. बीड) येथे झालेल्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक चळवळीत ते संशोधक व अभ्यासक म्हणून सक्रिय राहिले.

पैठण : अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे (Satyashodhak Samaj) माजी अध्यक्ष, सत्यशोधक चळवळीचे भाष्यकार, लेखक, विचारवंत प्रा. जी. ए. उगले (वय ७१) कर्करोगाने (Cancer) आज सकाळी साडेआठ वाजता पैठण येथे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी दोन वाजता पैठण येथे होईल.

प्रा. उगले गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक साहित्याचे आणि चळवळीचे संशोधन करीत होते. त्यांनी 'ज्ञानोदय आणि महात्मा फुले', 'सावित्रीबाई फुले', 'महात्मा फुले : मुक्त चिंतन', 'संपादक तान्हुबाई बिर्जे', 'सत्यशोधकांचे ओतूर', 'सावित्रीबाई रोडे', 'सत्यशोधक तुकाराम पिंजण', "सत्यशोधक समाजाची अधिवेशने : चिंतन आणि चर्चा', 'सत्यशोधकांचे अंतरंग', 'सत्यशोधक चळवळीचा समग्र इतिहास', 'सत्यशोधक मुकुंदराव पाटील', 'सत्यशोधकी झेंडा' असे वीस मौलिक ग्रंथ लिहिले.

GA Ugale Passed Away
Vishalgad Riots : विशाळगडावरील हिंसक आंदोलनात 2 कोटी 85 लाखांचं नुकसान; गजापुरातील बाधितांना शासनाकडून 25 हजारांची मदत

अजून सहा ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. गेवराई (जि. बीड) येथे झालेल्या सत्यशोधक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक चळवळीत ते संशोधक व अभ्यासक म्हणून सक्रिय राहिले. पूर्णपणे सत्यशोधकी विचाराने जीवन जगले आणि पदरमोड करून सत्यशोधकी साहित्याचे संशोधन केले.

GA Ugale Passed Away
Vishalgad Controversy : दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडवर कधी आला आणि कोठे राहिला? दंगलीनंतर काय म्हणाले मुश्रीफ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com