नांदेड : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९१ हजार ७३८ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला. परंतु, यातील दोन लाख १९ हजार शेतकऱ्यांचे नावे आधारनुसार दुरुस्त केली नसल्याने पुढील हप्ते रखडल्याने हे शेतकरी वेटिंगवर आहेत. संबंधितांनी नावे दुरुस्त करावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची ‘पीएम किसान’ योजना सुरू केली. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जाहीर केलेल्या योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंब निवडण्यात आले. यात जिल्ह्यातील एकूण खातेदारांपैकी तीन लाख ९१ हजार ७३८ कुटुंबप्रमुख अंतिम करून त्यांच्या बॅंक खात्यावर दोन हजार रुपयांनुसार तीन हप्त्यात सहा हजार देण्याचे प्रयोजन आहे.
हेही वाचा- ‘यांना’ सापडला भक्तितून आनंदाचा मार्ग
दोन लाख १८ हजार ९९० शेतकऱ्यांच्या नावात अद्याप दुरुस्ती केली नसल्याने
केंद्राने लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन लाख चार ९२५ शेतकरी कुटुंबप्रमुखांच्या खात्यावर पैसे जमा केले. यानंतर शिल्लक शेतकरी निवडण्याचे काम झाले. यामुळे ८६ हजार ८१३ शेतकऱ्यांची भर पडून शेतकरी संख्या तीन लाख ९१ हजार ७३८ झाली. यातील काही खात्यावर तीन हप्ते, तर काहींच्या खात्यावर एक हप्ता जमा झाला. यानंतर मात्र, रक्कम रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी सुरू होती. परंतु, या बाबत केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आधार कार्डवरील नाव तसेच बॅंक अकांउटवरील नावात तफावत जाणवत होती. यात बदल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, जिल्ह्यातील दोन लाख १८ हजार ९९० शेतकऱ्यांच्या नावात अद्याप दुरुस्ती केली नसल्याने शेतकरी वेटिंगवर आहेत.
योजनेच्या लाभार्थींना पोर्टलवर जाऊन स्वत: दुरुस्ती करता येईल.
केंद्र शासनाने आधारप्रमाणे नावात दुरुस्तीसाठी ता. ३० नोव्हेंबर अखेरपर्यंतची तारीख दिली होती. परंतु, सध्या शेतकरी संख्या अधिक असल्यामुळे यात वाढ करून शेतकऱ्यांनी नावात दुरुस्ती करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याकरिता ‘पीएम किसान’ पोर्टलवर पात्र लाभार्थींना नावे आधारप्रमाणे दुरुस्त करण्यासाठी ‘फामर्स कॉर्नर’ मध्ये ‘इडिट आधार फेलूर रेकॉर्ड’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमार्फत योजनेच्या लाभार्थींना पोर्टलवर जाऊन स्वत: दुरुस्ती करता येईल. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थींना आधार दुरुस्ती व इतर सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्राच्या सुविधेमार्फत मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थी, त्यांचे आधारकार्ड आधारित माहिती ‘पीएम किसान’ पोर्टलवर सुधारित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उघडून तर पहा- मोक्कातील फरार कमल यादव जेरबंद
तीन लाख ९१ हजार शेतकऱ्यांची नोंद
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक हेक्टरच्या मर्यादेतील शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यात तीन लाख चार हजार ९२५ शेतकरी संख्या आहे. तर केंद्र शासनाने हेक्टरची मर्यादा उठविल्यानंतर शेतकरी संख्येत वाढ झाली. नव्या निकषानंतर जिल्ह्यात तीन लाख चार हजार ९२५ शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी दोन लाख १८ हजार ९९० शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर नादुरुस्त दाखवत आहे. या शेतकऱ्यांना आगामी काळात आधारनुसार दुरुस्ती केल्यानंतर त्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम मिळणार आहे.
तालुकानिहाय पात्र व नादुरुस्त शेतकरी संख्या
तालुका......पात्र शेतकरी......नादुरुस्त संख्या
नांदेड.........१९,७७२...........८,४२८
अर्धापूर.......१३,०४२...........७,२१८
कंधार.........३२,२८८.........१८,८२३
लोहा..........३२,६७२.........१७,५०९
देगलूर.........२७,२३२.........१६,४३०
मुखेड..........४१,२२४.........२३,६६१
बिलोली........२३,९३८.........१५,७१२
नायगाव........२६,७४९.........१६,९११
धर्माबाद........१३,९८५..........८,८४२
उमरी...........१६,१५४...........९,४४४
भोकर..........२३,६५३.........१०,८०५
मुदखेड.........१४,२१२..........८,३२०
हदगाव.........४१,८०१.........२०,३९२
हि.नगर.........१६,८३१...........९,०१९
किनवट.........३२,७६८.........१८,१५३
माहूर............१५,४१७...........७,६६६
चुकीचा कोड....-------...........१,६५७
एकूण.........३,९१,७३८.......२,१८,९९०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.