Coronavirus| गुरुजी शाळेत विद्यार्थी मात्र घरीच...!

गरीब सामान्यांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांचे जीव गेले,अनेक कुटुंबांना याची झळ पोहंचली.
schools
schoolsschools
Updated on

जळकोट (लातूर): कोरोना संकटाने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले असून अद्यापही संकट टळलेले नाही. सद्यस्थितीत गुरुजी शाळेत तर शाळेची ओढ असणारे विद्यार्थी मात्र घरीच, असे शाळेकडे डोळे असलेल्या तालुक्यातील १७ हजार ४२ विद्यार्थ्यांचे मनाला चटका लावणारे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनाने समाजातील अनेक घटकांना अडचणीत आणले. विविध उद्योग, व्यवसाय, रोजगार, शेती आदिची कोंडी झाली.

गरीब सामान्यांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांचे जीव गेले,अनेक कुटुंबांना याची झळ पोहंचली. कोरोना योद्ध्यांचे काम महत्वाचे ठरले. एप्रिल-मे महिन्यात तर कोरोनाचा कहरच होता. ऑनलाईन शिक्षण सर्वच ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. शाळेत जाऊन मिळणारे ज्ञान व आनंद यापासून असंख्य मुले दूर राहिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला असल्याचे चित्र आहे. परिस्थितीने आता सर्व भिस्त ऑनलाईन शिक्षणावरच पडली आहे.

schools
लातुरचे शिवकुमार डिगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीपदी निवड

यात मोबाईल पासून ते नेटवर्क मिळण्यापर्यंतच्या अनेक अडचणी आहेत. गरीबांना असा मोबाईल घेणेही परवडणारे नाही.असे साहित्यिक तथा क्रांती विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सिंदगीकर यांनी सांगितले. शाळेत उपस्थित राहणाऱ्या गुरुजींना मुले नसल्याने शाळा मोकळी वाटत असून मुलांचा सहवास व प्रत्यक्ष अध्यापनातून मिळणारा आनंद मिळत नसल्याने परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेचीही चर्चा होत आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६५ तर खाजगी संस्थेच्या ५८ अशा एकुण १२३ शाळा असून यात १७ हजार ४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ७२२ शिक्षक कार्यरत आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरी बसूनच अभ्यास करावा लागत आहे. कोरोनाचे संकट कधी जाईल व चिमुकल्यांनी शाळा कधी गजबजतील? याची प्रतिक्षा आहे.

schools
कोरोना लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्टशी कसे लिंक करायचे?

तालुक्यातील ३५ शाळातून बाला उपक्रम सुरु आहे. ऑनलाईन अध्यापन तसेच सह्याद्री वाहिनीवरील विद्यार्थ्यांसाठीचे अध्यापन याची पालक- विद्यार्थ्यात जागृती करणे, वृक्षारोपन आदि उपक्रम सुरु असून पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध झाली नसल्याने मागच्या विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके जमा करुन ती यावर्षी वितरण करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

-आर.पी.भंडारी

(शिक्षणविस्तार अधिकारी, जळकोट)

कोरोनाच्या संकटात आमच्या आवडत्या विद्यार्थ्यांना शाळेत येता आले नाही. याची खंत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थी भेटी आदिमधून त्यांच्या संपर्कात असलो तरी प्रत्यक्ष शाळा सुरु होऊन अध्यापनातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. शासनाने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याबाबतचा विचार करणे योग्य राहिल असे वाटते.

-रणजित चौधरी (जिल्हा कोषाध्यक्ष, शिक्षक समिती लातूर)

गेल्या वर्षीपासून कोरोना संकटात शाळा बंद असल्याने मुलांचे मोठे नुकसान होत आहे. शिक्षकांना विद्यार्थ्याबद्दल तळमळ आहे. परंतु शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय असला तरी प्रत्यक्ष वर्गात गुरुजींचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते.

-अनिल पेन्सलवार (पालक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.