Video : मिलिंदनगरचा परिसर सील;चौघांची जिल्हा रुग्णालयात रवानगी

file photo
file photo
Updated on

परभणी : मिलिंदनगर येथे मुंबईहून आलेली एक महिला कोरोनाबाधित असल्याचे रविवारी (ता. १७) निष्पन्न झाल्यानंतर पालिकेने हा परिसर सील केला. सदरील महिलेच्या कुटुंबातील चार व्यक्तींना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याच बरोबर आरोग्य पथकाने घरोघरी जाऊन तपासण्या सुरू केल्याची माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

परभणी शहराच्या मिलिंदनगर भागात मुंबई येथून आलेल्या एका महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिकेची यंत्रणादेखील तत्काळ कामाला लागली. नवामोंढा पोलिस ठाण्याच्या सहकार्याने मिलिंदनगरचा काही भाग तसेच सदरील महिला ज्या घरात राहात होती तो परिसर सील करण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, सहायक पोलिस निरीक्षक राजू मुत्येपोड, कर्मचारी विठ्ठल कटारे, कैलास बाईनेवाड, भोकरे, श्री. दंडे, श्री. ससाने यांच्यासह  तातडीने परिसरात दाखल झाले व परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू केली. मिलिंदनगरला जोडणारे आठ रस्ते सील करण्यात आले. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करीत नागरिकांना प्रशासनास मदत करण्याचे आवाहन करतानाच कोणीही घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडणाऱ्यांना, विनाकारण फिरणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

आरोग्य पथके दाखल
महापालिकेची आरोग्य, निर्जंतुकीकरण करणारी पथकेदेखील तेथे पोचली असून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. त्याच बरोबर आरोग्य पथकांने सदरील महिलेच्या कुटुंबातील चारजणांना जिल्हा रुग्णालयात नेले असून तेथे त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य पथकाने मिलिंदनगर व परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणीचे काम सुरू केल्याचे आयुक्त श्री. पवार म्हणाले. 


हेही वाचा :हिंगोलीला पुन्हा धक्का, वसमतचे आठ जण पॉझिटिव्ह 


शहरात उडाली खळबळ
तब्बल एका महिन्यानंतर शेवडी (ता. जिंतूर) येथील तीनजणांना कोरानाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोनच दिवसांनंतर शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. बाधित व्यक्तींची संख्या आता चार झाली आहे.  विशेष म्हणजे हे चारही बाधित व्यक्ती मुंबईच्या विविध भागांतून शहरासह जिल्ह्यात दाखल झाले होते. 

हेही वाचा :​ होम क्वारंटाइन ऊसतोड मजूरांनी फुलवली बाग 

शहरात मोठ्या संख्येने घरवापसी
जिल्हाबंदीचे आदेश उठवल्यानंतर शहरात काहीजण परवाने, तर काहीजण विनापरवाने दाखल होत असल्याचे दिसून येते. परवाने असतील तर त्यांची तेथे व आल्यानंतर आरोग्य तपासणी होते की नाही, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. जर विनापरवाना येत असतील तर त्यांना अडवले गेले कसे नाही, यावरच आता प्रश्नचिन्हा निर्माण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.