सेलू ( जिल्हा परभणी ) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या पर्यावरण दिनी मराठवाड्यातील नैसर्गिक प्राणवायू निर्मितीसाठी परभणी जिल्ह्यासाठी पाच लाच लाख ५५ हजार रोप लागवड करण्यात येणार आहेत. मात्र सद्य: स्थितीत सेलू तालुक्यातील तिन शासकीय रोपवाटिकेत एकही रोप लागवडीसाठी तयार करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती सुत्रांनी दिल्याने सेलू तालुक्याचे सामाजिक वनीकरण रामभरोसे चालत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मागील एक वर्षांपासून इतर तालुक्यातील अधिकाऱ्यांकडे सेलू तालुक्यातील सामाजिक वनिकरणाचा अतिरिक्त पदभार देवून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जीवावर सामाजिक वनीकरणाचा कारभार चालत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रादुर्भाव सुरु असल्याने शासनाच्या वतीने कोणताही कार्यक्रम या कार्यालयांना दिला नसल्याने गेल्या वर्षापासून तालुक्यातील शासकीय रोपवाटिकेत रोपे तयार करण्यात आले नसल्याचे तोंडी उत्तर स्थानिक कर्मचाऱ्यांनी देऊन वरिष्ठांकडे बोट दाखवून स्वतःचे अंग झटकत आहेत.
हेही वाचा - केंद्र सरकारने २०२० मध्ये बँकिंग कायद्यात सुधारणा करून नागरी बँकांवरील रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण वाढविले आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून पावसाळ्यात अनेक नागरिक, सामाजिक संस्था वृक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत असतात. मात्र रोपे उपलब्ध नसल्यामुळे निसर्गप्रेमी नागरीकांचा हिरमोड झालेला आहे. पर्यावरण दिनी लाखो रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली असून मेगा प्लांटेशन करण्याचा कार्यक्रम आखलेला असतांना सद्यस्थितीत बंद अवस्थेत असलेल्या रोपवाटिका घोषना आणि प्रत्यक्ष कृती यातील तफावत ठळकपणे दर्शवणारी आहे.
कोरोना संक्रमणाचा सामना करतांना ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा बळी गेला आहे. म्हणून झाडे लावून नैसर्गिक ऑक्सिजन सहजरित्या उपलब्ध केला जाऊ शकतो. असे असतांना शासनाचे धोरण आणि स्थानिक पातळीवर बंद अवस्थेत असलेल्या रोपवटीकेचे वाळलेले तोरण यात निसर्गाच्या विकासाचे कुरण अडकले असल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिक बोलून दाखवत आहेत. जून महिना संपेपर्यंत सामाजिक वनीकरण विभागाने बाहेरच्या रोपवाटिकेतून रोपे आणून स्थानिकांना वाटप करण्याची मागणी निसर्गप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
येथे क्लिक करा - कोविशील्डच्या दोन डोसमध्ये कमीतकमी ८४ दिवस (१२ आठवडे) अंतर असणे बंधनकारक आहे.
तालुक्यातील सामाजिक वनिकरण विभागाच्या वीस घन वन प्रकल्पाच्या रोपवाटिका सद्य: स्थितीत बंद अवस्थेत असून शेवटच्या घटका मोजत आहेत. गेल्या एक वर्षांपासून सेलूला सामाजिक वनिकरण अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध नाही. (ता. पाच) रोजी पर्यावरण दिन होता. परंतु तालुक्यातील निसर्गप्रेमींना वृक्षारोपण करण्यासाठी झाडे उपलब्ध नाहीत. शासनाच्या वतीने कोणताही कार्यक्रम आखलेला नसल्याने वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.