Parbhani : सेलू नगरपालिकेच्या निवडणुका वेळेत होण्याची शक्यता मावळली

सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
Selu Municipal Council, Parbhani
Selu Municipal Council, Parbhaniesakal
Updated on

सेलू (जि.परभणी) : नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही. तसेच नगराध्यक्ष व प्रभागातील आरक्षण सोडत झाली नसली तरी शहरात राजकीय घडामोडीला वेग आला आहे. परंतु ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुका (Selu Municipal Council) वेळेत होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहरातील इच्छुक उमेदवार नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपापल्या प्रभागात नागरिकांच्या संपर्कात राहून मतदान पक्के करण्याच्या तयारीला आहेत. मागील निवडणुकीत शहरात १२ प्रभाग होते. एका प्रभागातून प्रत्येकी दोन प्रमाणे २४ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र नगरसेवकांची संख्या दोनने वाढून १३ प्रभाग होऊन २६ नगरसेवक निवडले जाणार असल्याची माहिती आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षाची (Parbhani) निवड करण्यात आली होती. परंतू यावेळी नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रभागात वजनदार उमेदवार देण्यासाठी चाचपणी करत आहेत. (Selu Municipal Council Election Not To Be Held On Time Parbhani News)

Selu Municipal Council, Parbhani
ओमिक्राॅनकडे दुर्लक्ष नको! ब्रिटनमध्ये एका दिवसात १० हजार नवे रुग्ण

जनसामान्यांत चांगली प्रतिमा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांचा शोध सुरू आहे. मागील निवडणुकीत शहरात जनशक्ती विकास आघाडीचे विनोद बोराडे यांनी काँग्रेसचे उमेदवार पवन आडळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी दोघांमध्ये तुल्यबळ लढत झाली होती. त्या निवडणुकीत विनोद बोराडे यांच्या जनशक्ती विकास आघाडीला १२, काँग्रेसला ५, शिवसेनेला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला २, तर अपक्षाला १ जागा मिळाली होती. जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आताही जोरदार तयारी सुरू केली आहे. याशिवाय काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनीही यावेळी जोरदार तयारी सुरू केली असून शहरातील विकास कामे करण्यावर भर दिला आहे. त्या सोबतच पवन आडळकर यांच्या सोबत तरूणांची फौज शहराच्या विकास कामात मोठ्या संख्येने दिसत असल्याने नगरपालिका निवडणुकीत त्यांचेच पारडे जड असल्याचे वातावरण सद्य:स्थितीत दिसत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे—बोर्डीकर यांचेही कडवे आव्हान दोन्ही पक्षांसमोर असणार आहे. दरम्यान आपलीच उमेदवारी पक्की म्हणून काही इच्छुक कामाला लागले आहेत. तर, काही नेते मंडळी अनेकांना झुलवून ठेवत असल्याचेही दिसत आहे. यावेळी नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु 'ओबीसी' आरक्षणाच्या तिढ्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुका वेळेत होणार नसल्याने इच्छूक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसत आहे.

Selu Municipal Council, Parbhani
एक जानेवारीपासून Online Paymentच्या नियमात होणार बदल, जाणून घ्या कोणते

'ओबीसी' आरक्षण राजकीय गोंधळामुळे नगरपालिकेच्या निवडणुका किमान दोन महिने पुढे ढकलण्याची शक्यता असून याच महिन्यात नगरपालिकेत प्रशासक लागणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी 'सकाळ' शी बोलतांना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()