सेलू (जि.परभणी) : सेलू नगरपालिकेच्या (Selu Municipal Council) निवडणुकीसाठी प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण सोडत, ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हे स्पष्ट होण्यापूर्वीच नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रकारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे दिसत आहे. यामुळे शहरात चांगलेच राजकीय वातावरण तापत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर मुदतीच्या आत निवडणुका होऊ शकल्या नाहीत. शासनाने दोन सदस्य प्रभाग पद्धत व एकूण १३ प्रभागांतून २६ सदस्य संख्या निश्चित केली आहे. नगराध्यक्षपदाची थेट जनतेतून निवडणूक न घेता सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने देणगी, आश्वासने आणि स्वखर्चाने अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरु झाली आहेत. या निमित्ताने आरती, महाप्रसादाला नेते मंडळी उपस्थित राहत आहेत. (Selu Municipal Council Election Ruling And Opposition Parties Busy In Function Parbhani)
धार्मिक कार्यासाठी भाविकांची गर्दी दिसताच देगणी जाहीर करताना इच्छुकांनी हात मोकळा सोडला आहे. निवडून आल्यानंतर आवश्यक ती कामे करून देण्याचे आश्वासनही दिले जात आहे. काही इच्छुकांनी तर प्रभागातील छोटी-मोठी कामे स्वखर्चातून करण्याचा सपाटा लावला आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच कार्यक्रम घेण्याची स्पर्धा लागली आहे. नगरपालिका निवडणुकीत ५० टक्के महिला मतदार आहेत. महिला धार्मिक कार्यक्रमात हमखास सहभागी होतात. हेच लक्षात घेऊन पालिकेतील सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षाने राज्यातील नामवंत किर्तनकारांचे कीर्तन आयोजित करून गर्दी जमविण्याचा सपाटाच सुरु केला आहे. लोकांसमोर स्वतःची स्तुती करून घेण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे. तर धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून नागरिकांसमोर जात शक्तिप्रदर्शन करण्यास एक प्रकारची सुरुवातच केली आहे.
१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, नाव वगळणी आणि मतदार यादीतील नावे स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबविला होता. त्यातही इच्छुकांनी लक्ष घालत आपल्या नातेवाईक, मित्र आणि आपल्याला हमखास मतदान करतील अशा व्यक्तींची नावे आपल्या प्रभागात टाकली आहेत. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, विविध पदांवर नियुक्ती झालेल्या व्यक्तींचा सत्कार आणि ज्या कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी होत आहे. अशीच संधी साधून इच्छुक प्रत्येक समारंभात हजेरी लावत आहेत. त्यामुळे एक प्रकारे इच्छुकांनी जोरदार प्रचारच सुरू केला आहे कि काय? अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
याच महिन्यात नगरपालिकेच्या सदस्यांची मुदत संपली आहे. परंतु अद्यापपर्यंत शासनाकडून प्रशासक नेमण्यासाठी कुठलेही आदेश आले नाहीत.
- निलेश सुंकेवार, मुख्याधिकारी, नगरपालिका, सेलू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.