आमदार रोहित पवार यांनी पाठविले परभणीत सॅनिटायझर 

file photo
file photo
Updated on

परभणी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परभणीकरांना थेट बारामती येथील बारामती ऍग्रो कंपनी मार्फत आमदार रोहित पवार यांनी तब्बल ५०० लिटर सॅनिटायझर पाठवले आहे. शनिवारी (ता.११) हे सॅनिटायझर जिल्हाधिकाऱ्यांकडे सूपुर्द करण्यात आले. 

कर्जत जामखेड येथील राष्ट्रवदी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि बारामती ॲग्रो लिमिटेडच्या वतीने पाचशे लिटर सॅनिटायझर परभणीसाठी मोफत पाठवले आहे. शनिवारी (ता.११) दुपारी बारामती येथून सॅनिटायझरचा ट्रक परभणीमध्ये येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबजानी दुर्राणी यांनी ५०० लिटर सॅनिटायझर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, तहसीलदार विद्याचरण कडावकर यांच्याकडे सुपूद केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, इम्रान हुसैनी, सुमंत वाघ, शंकर भागवत, रितेश काळे, कृष्णा कटारे, सिद्धांत हाके, किरण तळेकर, दीपक वारकरी, योगेश देशमुख, सुदर्शन काळे, ओंकार वडकूते आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा व पहा -Video : ‘कोरोनाने’ कोमेजली फुले !

हेही वाचा ...

नगर परिषदेतर्फे उभारला निरजंतुकीरण कक्ष
सेलू (जि.परभणी) :
कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या प्रवेशद्वार जवळ निरजंतुकीरण कक्ष (सॅनिटायझर रुम) शनिवारी (ता.१२) उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते सुरू  करण्यात आला आहे. 
देशात व राज्यात कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात अद्यापही या विषाणूची बाधा झाली नाही. नगर परिषद व प्रशासन सध्या सतर्कतेने परिस्थिती हातळत आहे. नगर परिषदेने प्रवेश द्वाराजवळ उभारलेल्या निरजंतुकीरण कक्षातून कर्मचारी व नागरिकांना प्रवेश बंधनकारक केला असल्याचे नगर परिषद प्रशासनाने ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले आहे. ज्यामुळे विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. निरजंतुकीरण कक्षाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तहसीलदार बालाजी शेवाळे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देवीदास जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. एम. सोनवणे, पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगांवकर, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डाॅ.संजय हरबडे, सभापती, नगरसेवक यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. 

पोलिस ठाण्यातही निरजंतुकीरण कक्ष
सेलू शहरातील महेश रुग्ण सेवा मंडळा तर्फे उपजिल्हा रुग्णालयात तसेच पोलिस स्टेशन मध्ये नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या तर्फे निरजंतुकीरण कक्ष तयार करुन देण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेत झालेल्या बैठकीत जयप्रकाश बिहाणी व विनोद बोराडे यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.