नांदेडात सात महिन्यात सातशेंना अटक

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्ह्यात देशी दारु, हातभट्टी, सिंदी व बनावट दारु अवैध मार्गाने विक्री व साठा करून ठेवणाऱ्या सातशें जणांना अटक केली. तर ९६४ प्रकरणात गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून एप्रील ते आॅक्टोबर या सात महिण्यात तब्बल एक कोटी दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून करण्यात आली.

नांदेड जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे असून हा जिल्हा सोळा तालुक्यात विभागला गेला आहे. तसेच शेजारी तेलंगना, कर्नाटक राज्याच्या सिमा आहेत. तसेच किनवट व माहूर या दोन तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जंगलात मोहफुल सहज या भागातील नागरिकांना उपलब्ध होतात. एवढेच नाही तर अनेक जण मोहफुले जमा करण्यात आपला रोजगार समजतात. मात्र मोहफुले विक्री करून किंवा स्वत:  त्यापासून रसायन मिश्रीत हातभट्टी दारु बनवितात. ही बनवलेली देरू अनेक वेळा शरिराला घातक असते. अनेकांचे या दारु सेवनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दारुपायी अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहे. जिल्ह्यात अशा प्रकाराची अवैध दारु तयार करून विक्री करणाऱ्यांविरूध्द राज्य उत्पादन शुल्क विभाग सतत कारवाई करीत असते. सर्वाधीक कारवाई ही माहूर, किनवट, धर्माबाद, देगलूर आणि नांदेड या तालुक्यात केल्या जात असते. 

अधिक्षक निलेश सांगडे सन्मानीत

नांदेडमध्ये तर लोकसभा निवडणुकीच्या काळात बनावट दारु बणविणारे काराखाने उध्दवस्त केले होते. कारवाईची दखल त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतली होती. जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांना सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता. जिल्ह्यातील अवैध मार्गाने देशीदारु, हातभट्टी, सिंदी आणि बनावट दारु विक्रीची ठिकाणावर छापा टाकुन ते समुळ उच्चाटन करण्यासाठी हा विभाग सतत प्रयत्न करीत असतो. या काळात गतवर्षीपेक्षा दुप्पट महसुल जमा केला. 

आकडे बोलतात- 

सन २०१८- १९ : दाखल गुन्हे - ९४३, गुमात्मक गुन्हे - दोन, वारस गुन्हे - ६७४, बेवारस गुन्हे - २६९, अटक आरोपी - ६८२, जप्त वाहने - ६६ असा एकूण मुद्देमाल ५७ लाख ३६ हजार ८९८ रुपये.
सन २०१९- २० : दाखल गुन्हे - ९६४, गुणात्मक गुन्हे - ११, वारस गुन्हे - ६९७, बेवारस गुन्हे - २६७, अटक आरोपी - ६९९, जप्त वाहने - ९३ असा एकूण एक कोटी दोन लाख सहा हजार ८४७ रुपयाचा महसुल जमा केला. 

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल

जिल्ह्यात देशी दारु, सिंदी, गोवा निर्मीत विदेशी बनावट दारु, हातभट्टी आपल्या परिसरात होत असले तर राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. नांदेडमधील माझे सर्व अधिनस्त अधिकारी व कर्मचारी अवैध धंदे बंद करण्यासाठी सतत परिश्रम घेतात. त्यांच्याच बळावर नांदेड जिल्हा महसुल व कारवाईत विभागात पहिला असतो. यासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व माझे सर्व वरिष्ठ अधिकारी यासाठी मला प्रोत्साहन देतात. त्यांच्याच बळावर दिलेल्या उदिष्टापेक्षा महसुल अधिक जास्त करत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. जिल्हा अवैध देशी दारु, हातभट्टी मुक्त करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 
निलेश सांगडे - जिल्हा अधिक्षक,  नांदेड.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.