वयाच्या चाळीशीत चोरी गेलेले सोने मिळाले २२ वर्षानंतर, शकुंतलाबाईंची चोरीला गेलेल्या अडीच ग्रॅम सोन्याची कहाणी

Kalamb News Shakuntala Shinde
Kalamb News Shakuntala Shinde
Updated on

कळंब (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील येडेश्वरी देवीच्या यात्रेत उस्मानाबाद जिल्ह्यातील वाकरवाडी येथील शकुंतला विठ्ठल शिंदे या विवाहित महिलेचे अडीच ग्राम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मनिमंगळसूत्र २२ वर्षांपूर्वी चोरट्याने लंपास केले होते. त्यावेळी शकुंतलाबाईचे वय ४० वर्षे होते. तब्बल २२ वर्षे म्हणजे आता त्यांचे वय ६० असून त्यांना २ मार्च रोजी कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या हस्ते सोन्याचे दागिने परत करण्यात आले. वयाच्या ४० वर्षात चोरट्याने पळवलेले सोन्याचे दागिने वयाच्या ६० व्या वर्षात मिळाले. प्रदीर्घ कालावधीनंतर शकुंतलाबाई शिंदे याना सोन्याचे दागिने जशाच तसे मिळाल्याने त्यांचे डोळे पाणावले होते.

पोलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद तालुक्यातील वाकरवाडी येथील महिला शकुंतला शिंदे असून शेती पिकवीत त्या मजुरी करून आपल्या कुटूंबाची उपजीविका भागवत आहेत. १९९८ मध्ये शकुंतलाबाई व पती विठ्ठल हे दाम्पत्य कळंब तालुक्यातील येडेश्वरी देवीच्या चैत्र महिन्यात भरण्यात येत असलेल्या यात्रेत आल्या होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने गळ्यातील अडीच ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पळविले. आरडाओरडा केला. पण उपयोग झाला नाही. त्यावेळी येरमळा येथे पोलिस ऑउटपोस्ट होते. शकुंतलाबाई यांनी रीतसर फिर्याद दिली. तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यानी वर्षभरात चोरी प्रकरणातील गुन्ह्याचा तपास लावला होता. दरम्यानच्या काळात शकुंतलाबाई यांनी दोन वेळेस पोलिस ठाण्याकडे मंगळसूत्र सापडले. याची माहिती घेण्यासाठी चकरा मारल्या.

त्यावेळचे तपास अधिकारी बदलून गेले. त्यामुळे तपासात उघडकीस आलेले सोन्याचे दागिने पोलिस ठाण्यातच जमा राहिले. पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावण्या होत गेल्या. न्यायालयीन प्रक्रियेत मंगळसूत्र अडकून पडले असून चोरट्याला शिक्षा झाली नाही. वर्षे १९९८ मध्ये चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तपास वर्षे २०१० मध्ये तपास लागला. १३ जुलै २०१९ मध्ये शकुंतलाबाई शिंदे यांच्या दागिन्यांचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीस आले.

त्यानंतर येथील न्यायालयात लोकअदालत झाली त्यात हे प्रकरण लोकअदालती समोर ठेवण्यात आले. लोकअदालतने शकुंतलाबाई याना अडीच ग्राम वजनाचे मंगळसूत्र परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले.न्यायालयाचा आदेश असल्यामुळे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी स्वतः लक्ष घालून फिर्यादी महिला सध्या कुठे राहते. मंगळसूत्र चोरीस गेलेले शकुंतलाबाई यांचेच आहे का याबाबतची चौकशी करून उस्मानाबाद तालुक्यातील वाकरवाडी येथील या महिलेस पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन मंगळसूत्र परत केले.


शकुंतलाबाईचे डोळे पाणावले
१९९८ ला येडेश्वरी देवीच्या यात्रेत चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र पळविले. त्यावेळचे सोन्याचे दर १ हजार ८०० रुपये प्रतितोळा असावेत असा अंदाज आहे. त्यावेळी त्याचे वय ४० होते. चोरीस गेलेले मंगळसूत्र तब्बल २२ वर्षांनी म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी परत मिळाल्याने मंगळसूत्र मिळताच शकुंतलाबाईचे डोळे पाणावले होते. त्याचे पती विठ्ठल शिंदे सोबत होते.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()