Latest Gangapur News: गंगापूर खुलताबाद मतदारसंघात शेती, सिंचन, पर्यटन आदी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन शरद पवार यांनी केले.
गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज खा.शरद पवार यांची आज गंगापूर शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत.