भाजपमध्ये गेले तरी मला त्यांची चिंता नव्हती - शरद पवार

NCP president Sharad Pawar
NCP president Sharad Pawar esakal
Updated on
Summary

विजय गव्हाणे हे शेकाप आणि अण्णासाहेबांचा विचार घेऊन येतात, ते दोस्तीला खरे आहेत असं म्हणत कौतुक केलं.

परभणी - भाजपचे (BJP) माजी आमदार विजय गव्हाणे (Vijay Gavhane) यांनी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विजय गव्हाणे हे शेकाप आणि अण्णासाहेबांचा विचार घेऊन येतात, ते दोस्तीला खरे आहेत असं म्हणत कौतुक केलं.

शरद पवार म्हणाले की, आजचा विचार हा समाजकारणाचा आहे आणि आता तो आपण करू. परभणी हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. शेतकरी कामगार पक्षाची सुरुवात इथूनच झाली. अण्णासाहेब हे मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी लोकांना मदत करायला सुरुवात केली. आता तोच विचार घेऊन विजय गव्हाणे येत असल्याचं शरद पवार म्हणाले.

विजय गव्हाणे हे दोस्तीला खरे आहेत. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे राजकारणात माझे विरोधक होते पण ते मैत्रीला खरे होते. त्यावेळी विजय गव्हाणे भाजपमध्ये गेले. मात्र मला त्याची चिंता नव्हती, कारण भाजपचे विचार त्यांनी कधीच घेतले नाहीत. त्यामुळे ते इकडे येणारच होते. आता ते आले याचा मला आनंद असल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं.

NCP president Sharad Pawar
''फडणवीस स्टेजवरचे नट, भाजप तर राणे आणि विखे-पाटील चालवतात''

उत्तर प्रदेश निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर भाजपमध्ये गळती सुरु झाली आहे. त्यावरून बोलताना शरद पवार म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये तर आम्हीचं जिंकणार हे चित्र भाजपनी त्यार केलं. पण आता बघा सगळे त्यांना सोडून चाललेत. गोव्यात पण तेच होत आहे. भाजपमधला विचार बदलला आहे. आता बहुजनांचा विचार होत नाही त्या पक्षात आणि हे सत्य असल्याचंही पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()