Success Story : लहानपणीच हरवले वडिलांचे छत्र; ऊस तोडून आईने केले शारदाचे शिक्षण, ९७ टक्के गुण

शारदाचे पहिली ते तिसरी पर्यंचे शिक्षण गंगामसला येथे तर चौथी ते सहावी प्रवरा नगर गर्ल्स इंग्लिश स्कुल प्रवरानगर येथे झाले. सातवी ते दहावी ईगलवुड इंग्लिश स्कूलमध्ये झाले.
sharada dugane score 97 percent in 10th cbse board family support education
sharada dugane score 97 percent in 10th cbse board family support educationSakal
Updated on

माजलगाव : तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथील शारदा जनार्दन दुगाने हीने परिस्थितीवर मात करत दहावी सीबीएसई परिक्षेत ९७ टक्के गुण मिळवीत ईगलवुड शाळेतून व्दितीय क्रमांक मिळविला आहे. वडिलांचे छत्र वयाच्या तिस-या वर्षीय हरपले परंतु आई उषा जनार्दन दुगाने हिने जिद्दीने मुलगी शारदाच्या शिक्षणासाठी वेळप्रसंगी ऊसतोडणीचे काम केले. तिने मिळविलेल्या गुणांमुळे तिच्या आईच्या कष्टाचे चीज झाले आहे.

तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथे दुगाने कुटुंबीय राहते. शारदा दुगाने हिची आई उषा दुगानेचा विवाह जनार्दन दुगाने (रा. वाघाळा ता.पाथरी जि. परभणी) यांचेशी झाला होता. त्यांना शारदा नावाची एक मुलगी झाली परंतु नियतीने या दुगाने कुटुंबीयांवर वक्रदृष्टी टाकली आणि वडील जनार्दन दुगाने यांचे विहिरीत पडून अपघाती निधन झाले.

अशा परिस्थितीत उषा दुगाने यांनी सावरत त्यांच्या आईकडे सरवर पिंपळगाव येथे आल्या आणि मुलगी शारदा हीस शिक्षण देण्यासाठी हाताला मिळेल ते काम करत जिद्दीने शिक्षण दिले व काम करून शैक्षणिक शुल्क भरले.

शारदाचे पहिली ते तिसरी पर्यंचे शिक्षण गंगामसला येथे तर चौथी ते सहावी प्रवरा नगर गर्ल्स इंग्लिश स्कुल प्रवरानगर येथे झाले. सातवी ते दहावी ईगलवुड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. नुकताच सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल लागला असून यामध्ये शारदाने ९७ टक्के गुण मिळवीत यशाचे शिखर गाठले आहे.

मराठी विषयात १०० गुण मिळविले

सिबीएसई बोर्ड दहावीच्या परिक्षेत शारदाने ९७ टक्के गुण मिळविले असून सर्वात अवघड आणि गुण कमी करणारा विषय म्हणुन ओळख असलेल्या मराठी विषयात तीने पैकीच्या पैकी१०० गुण मिळविले आहेत. इंग्लिश ९३, गणित ९८, विज्ञान - ९५ असे प्रत्येक विषयात नव्वदच्यावर गुण मिळविले.

पुढील शिक्षण संभाजीनगरला घ्यायचे असून जेईई परिक्षेची तयारी करणार आहे. आईने केलेल्या कष्टामुळेच यश गाठले असून अभियंता होवून भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा आहे. आयएएस व्हायच आहे.

- शारदा जनार्दन दुगाने, सरवर पिंपळगाव

पती जनार्दन यांचे अकाली निधन आणि कुटुंबाची पडलेली जबाबदारी यातून जगणे कठीण वाटत होते. परंतु, मुलगी शारदा हीस उच्चशिक्षित करण्यासाठी जगायचे असे ध्येयसमोर ठेवून तिला शिकविले. दहावीच्या परिक्षेत शारदाने मिळविलेल्या यशाचा अभिमान आहे.

- उषा जनार्दन दुगाने, सरवर पिंपळगाव

आमच्या शाळेतील दहावी वर्गातील शारदा ही गुणवंत विद्यार्थीनी असून अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत दैदिप्यमान यश मिळविले आहे तर शाळेचे व सरवर पिंपळगाव या गावचे नाव उज्वल केले आहे. आगामी काळात तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हातही देत पालकत्व स्विकारले आहे.

- डॉ. अर्चना शरद पवार, अध्यक्षा, ईगलवुड इंग्लिश स्कुल, माजलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.