Shirpur Jain News : पार्श्वनाथाच्या दारात पुन्हा राडा; काठ्यांनी बेदम मारहाण, दोन गंभीर जखमी

संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेले व जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिरात ता. 5 ऑक्टोबर रोजी श्वेतांबर व दिगंबर पंथीयांमधे क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण निर्माण झाला.
jain mandir
jain mandirsakal
Updated on

शिरपूर जैन - संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेले व जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिरात ता. 5 ऑक्टोबर रोजी श्वेतांबर व दिगंबर पंथीयांमधे क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण निर्माण झाला व वादाचे रूपांतर प्रचंड हाणामारीत झाल्याने एक महिला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेमुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तब्बल 42 वर्षानंतर दिगंबर व श्वेतांबर पंथीयांच्या न्यायालयीन संघर्षानंतर 22 एप्रिल 1981 पासून बंद असलेले मंदिर, ता. 11 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने उघडण्यात आले होते. त्यानंतर पार्श्वनाथच्या मूर्तीचे लेपन कार्य करण्यात आले. त्यादरम्यान सुद्धा या मंदिरामध्ये अनेक बाबीवर दोन्ही पंथियाचे एकमत होत नसल्याने वाद निर्माण झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर परिसरात 144 कलम लागू केले. मंदिर उघडल्यापासून हजारोंच्या संख्येने देशभरातून भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. असे असताना अंतर्गत कारणावरून या दोन्ही पंथियामध्ये नेहमीच विविध प्रकारचे शाब्दिक वाद होत आहेत. व त्यामुळे मंदिर परिसरातील धार्मिक व सामाजिक वातावरण बिघडत आहे.

ता. 5 ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान दोन्ही पंथियामध्ये मंदिरामध्ये शुल्लक कारणावरून पुन्हा अंतर्गत वाद उफाळून आला व दोन्ही पंथीयांचे अनुयायी आपसात भिडले. मोठ्या प्रमाणावर शाब्दिक वाद निर्माण केला व त्या वादाचे पर्यावसन प्रचंड हाणामारीत झाले.

काहींनी लाकडी काठ्यांनी मारहाण करून मोठा राडा निर्माण केला. असे सामाजिक माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ फुटेजवरून स्पस्ट दिसून येत आहे. सदर घटनेमध्ये श्रीमती सुवर्णमालाबाई महाजन व सुधीर भुरे हे गंभीर जखमी झाले.

त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे उपचार करून पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठविण्यात आले. तर देवेंद्र महाजन उषाबाई गोरे, वंदना भुरे, संदीप भुरे, महावीर टिकाईत, यांनाही काठ्यांनी मारहाण करण्यात आली त्यामध्ये हे किरकोळ जखमी झाले आहेत. वृत्तलाहेपर्यंत दोन्ही पंथियाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

सदर घटनेमुळे शिरपूर येथे व मंदिर परिसरामध्ये पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. व याच्या झळा मंदिर परिसरातील स्थानिक नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सदर प्रकरणाबाबत माहिती मिळतात शिरपूरचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण एपीआय महेश मछले, एपीआय रवींद्र टाले, व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही पंथीयांशी चर्चा केली.

सदर घटनेतील दोषींना जोपर्यंत पोलीस प्रशासन तात्काळ अटक करत नाही व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत नाही. तोपर्यंत सिद्धांत सागर जी महाराज व ब्रह्मचारी तात्या भैया हे पार्श्वनाथच्या मंदिरासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. सदर प्रकरणाबाबत आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्व जिल्हावाशांचे लक्ष लागले आहे.

सदर घडलेल्या प्रकरणाबाबत श्वेतांबर संस्थांनचे व्यवस्थापक व ट्रस्टी यांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

गेले चार ते पाच महिन्यापासून श्वेताबर पंथियाच्या वतीने ७० ते ७५ खासगी सुरक्षा रक्षक येथे काठया घेवुन वास्तव्यास आहेत. त्यांचा एकच उद्देश आहे. महाराष्ट्रीयन जैन लोकांना येथुन हाकलुन लावने. पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करून कारवाई करावी.

- दिगंबर ब्रह्मचारी, तात्या भैया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.