Ambadas Danave: "आधी चक्की पिसिंग पिसिंग आता किसिंग किसिंग"; दानवेंचा फडणवीसांना टोला

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अजित पवारांना सत्तेत जागा दिल्यावरुन दानवेंनी भाजपवर टीका केली आहे.
Ambadas Danve vs Devendra Fadnavis
Ambadas Danve vs Devendra Fadnavisesakal
Updated on

छ्त्रपती संभाजीनगर : भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केल्यानंतरही अजित पवारांना सत्तेत सहभागी करुन घेणाऱ्या भाजपवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला आहे. आधी अजित पवारांविरोधात बोलताना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजितदादा किसिंग किसिंग सुरु आहे, अशा शब्दांत दानवेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. (ShivSena Ambadas Danave critisises on NCP Ajit Pawar and BJP Devendra Fadnavis)

Ambadas Danve vs Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal: "ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावं ठेवत नाहीत"; भुजबळांचा भिडेंवर निशाणा

सामनातही आज म्हटलंय की, सांभाळून राहा कारण राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावं लागतंय. ज्या व्यक्तीविरोधात सत्तार हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीभर पुरावे घेऊन जायचं ठरलं होतं त्या अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं आणि आता अजितदादा किसिंग किसिंग सुरु आहे, अशा शब्दांत दानवेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

Ambadas Danve vs Devendra Fadnavis
Raj Thackeray News: राजकीय पक्षांनी पाळलेले लोक आहेतच, त्यांच्यावर...; राज ठाकरेंचा पत्रकारांना सल्ला

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही यावेळी दानवेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, "भागवत कराड हे चांगला माणूस आहेत पण चांगले नेते नाहीत. त्याचबरोबर भावना गवळी आणि किरिट सोमय्या यांच्यावरही त्यांनी टीका केली. (Latest Marathi News)

सोमय्या आणि गवळी यांच्यावर आरोप करणारे सीए उपेंद्र मुळे यांच्या भेटीवरुन त्यांनी भाष्य केलं आहे. सोमय्या गुप्त दौरे करतात कारण ते शिवसेनेला घाबरतात, त्यांना खुला दौरा करायचा असता तर ते शहरात येऊ शकले नसते" (Marathi Tajya Batmya)

Ambadas Danve vs Devendra Fadnavis
Raj Thackeray : सत्ता आल्यावर ती जाण्याची प्रक्रिया सुरू होते; राज ठाकरेंचा भाजपसह माध्यमांना टोला

भाजपवर साधला निशाणा

भाजप आपला ग्राहक वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. या पक्षात आता मुळचे लोक बोटावरच मोजण्याइतपतच राहिले आहेत. हा पक्ष मोठा करणारे लोक कुठे आहेत? असा सवाल करताना या सर्व गोष्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्या असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. कॅगचा अहवाल समोर आला आहे त्यामुळं आता भाजपचे टोलनाकेही समोर येतील, असा टोलाही त्यांनी लागावला.

Ambadas Danve vs Devendra Fadnavis
G Parameshwar : काँग्रेस सरकार 5 वर्षे टिकणार, भाजपचेच काही आमदार आमच्या संपर्कात; गृहमंत्र्यांचा मोठा दावा

शिंदे गटावर निशाणा

लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून कोणी बसलेलं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच जिंकणार असंही दानवेंनी म्हटलं आहे. शिंदे गटाला आणि भाजपला आम्ही पुरुन उरु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()