उमरगा तहसीलमधील सात कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Officers gave Show cause notice to Workers in Health Department
Officers gave Show cause notice to Workers in Health Department
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राज्य सरकारने (Maharashtra) कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केला. कार्यालयीन वेळेत थोडी वाढ केली. मात्र कार्यालयात वेळेत उपस्थिती न राहणे, कामकाजाच्या वेळेत दांडी मारण्याचे प्रकार दिसू लागलेत. दरम्यान मंगळवारी (ता.१७) सकाळी पावणे दहाची वेळ असताना सव्वा अकरापर्यंत कार्यालयात (Umarga Tahsil) नसणाऱ्या एक अव्वल कारकुन, तीन लिपीक व तीन शिपायांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे. तहसील कार्यालयात विविध (Osmanabad) कामासाठी ग्रामीण भागातुन अनेक नागरिक येतात. त्यांच्या कामाचे निरसन अथवा कागदपत्रे मिळण्यासाठी नागरिकांची दमछाक होते. बरेच कर्मचारी कामकाज प्रामाणिक करतात तर काही जणांचा रुबाब हा वेगळाच असतो. दरम्यान मंगळवारी प्रभारी तहसीलदार एन.आर. मल्लूरवार, नायब तहसीलदार (पुरवठा) संभाजी थोटे यांनी उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांचा ज्या-त्या विभागात पंचनामा केला. तेथे महसूल विभागातील तीन कर्मचारी, एक अव्वल कारकून, तर तीन शिपाई हजर नव्हते. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Officers gave Show cause notice to Workers in Health Department
'मोदी आत्ममग्न नेतृत्व, सर्वकाही मीच करतो हे दाखविण्याचा प्रयत्न'

नवीन तहसीलदारांच्या नेमणुकीची प्रतिक्षा

तहसीलदार संजय पवार यांची बदली झाल्याने निवडणूक विभागाने नायब तहसीलदार एन.आर. मल्लुरवार यांच्याकडे नऊ ऑगस्टपासुन पदभार आहे. एकुण पाच नायब तहसीलदारांच्या जागेपैकी महसूल विभागातील दोन जागा रिक्त आहेत. नव्याने येणाऱ्या तहसीलदारांची फिल्डींग परफेक्ट झालेली नसावी म्हणुन की काय अद्याप नवीन तहसीलदाराची नियूक्ती झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()