Shravani Somvar: वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त तैनात

Latest Parali News: मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग लावून महिलांसाठी वेगळ्या रांगांची सोय करण्यात आली आहे.
Shravani Somvar:  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त तैनात
Updated on

परळी वैजनाथ

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी मंदिर परिसरात हर हर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय असा शिवनामाचा जयघोष करीत देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या दोन लाखांवर शिवभक्तांनी श्रावणातील पहिल्या सोमवारी (ता.०५) घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन, वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. दुपारी १ पर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले आहे. रविवारी मध्य रात्रीपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविक भक्त रांगेत उभे होते. भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता वैद्यनाथ मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिवभक्तांच्या दर्शनासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. late

Shravani Somvar:  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त तैनात
Shravani Somvar: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पुरातन तुंगारेश्वर महादेव मंदिराची महती तुम्हाला माहीत आहे का?

श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा,गुजरात, मध्यप्रदेश आदी भागांतून भाविक भक्त दाखल झाले आहेत. श्रावण महिन्या निमित्त गोदावरी हुन गंगेचे पाणी कावडीने पायी परळीला आणून वैद्यनाथाला अभिषेक करण्यासाठी आलेल्या भाविकांना दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वैद्यनाथ मंदिराकडून होणारी वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली आहे. महादेवाला बेल अधिक आवडत असल्याने बेल-फुलांना प्रचंड मागणी होती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला, मुले, मुली आणि पुरुषही थांबले होते. तसेच लहान मुलांसाठी लहान मोठी खेळणीची दुकानेही लावण्यात आलेली आहेत.

Shravani Somvar:  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त तैनात
Shravani Somvar : उपवासाला साबुदाणा, बटाटा खाऊन पोट खराब करण्यापेक्षा रताळी खा अन् हेल्दी रहा, जाणून घ्या फायदे

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी वैद्यनाथ मंदिरासह शहर व तालुक्यातील सर्व शिव मंदिरे शिव भक्तांनी गजबजून गेले होते. मालेवाडीचे अंधारेश्‍वर, जिरेवाडीचे सोमेश्‍वर, तपोवनचे रामेश्‍वर, सोनहिवरा महादेव मंदिर, टोकवाडीचे रत्नेश्‍वर, धर्मापुरीचे मल्लिकार्जुन, कासारवाडीचे केदारेश्‍वर, गाढेपिंपळगाव चे पापदंडेश्वर अशा ग्रामीण भागातील शिवमंदिरामध्ये शिवभक्तांनी पहाटे पासूनच दिवसभर गर्दी केल्याचे दिसत होते.

यासंदर्भात वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी सांगितले की, पवित्र श्रावण महिन्यात शिवभक्तांना दर्शन घेता येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याचा अंदाज होता. तशी पहिल्या सोमवारी गर्दी झाली. यामुळे देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिवभक्तांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. भाविक भक्तांसाठी तीन रांगा,यामध्ये महिला व पुरुष वेगळी तर तिसरी रांग पास वाल्या भक्तांसाठी आहे. या दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

Shravani Somvar:  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त तैनात
Shravan 2024 : पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? शिवामूठ वाहण्याचे काय आहे महत्व?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.