आडूळ - आडूळ गावापासून जवळच असलेल्या गेवराई बु. (ता. पैठण) येथील श्री नगदेश्वर गडावर सोमवारी (ता. ५) श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आडुळसह तालुक्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या गडावर महादेवाचे भव्य मंदिर असून याठिकाणी दरवर्षी भव्य यात्रा भरते.
आडूळसह कडेठाण, रजापूर, देवगाव, दाभरुळ, एकतुनी, घारेगाव, सांजखेडा, पांढरी, पिंपळगाव, गेवराई, हिरापुर, बालानगर, पारुंडी, पारुंडी तांडा, दरेगाव, कचनेर, होनोबाची वाडी, खोडेगाव, चित्ते पिंपळगाव, आडगाव, अंतरवाली खांडी सह परिसरातील भाविकांनी बाळ गोपाळसह पायी चालत जाऊन मनोभावे रांगेत उभे राहून 'हर हर महादेव, जय भोले' च्या जयघोषात शिस्ताईने दर्शन घेतले.
तसेच पहाटे महाजलाभिषेक, पूजन, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम हि संपन्न झाले. गेवराई आगलावे गावातुन ते वर गडावर सकाळी महादेवाच्या मुकुटाची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. वार्षिक यात्रेनिमित्त गडावर जाण्यासाठी परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी परंपरेनुसार याठिकाणी मोठी यात्रा भरते.
यात्रेत दूरवरून डोंगर चढून पायी आलेल्या भाविकांसाठी आडूळ व गेवराई येथील युवकांतर्फे मोफत फराळ व जल पाणाची व्यवस्था करण्यात आली होती. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
विशेष म्हणजे परिसरातील गावातील असंख्य तरुण श्रद्धेने मागील कित्येक वर्षांपासून पैठण येथील गोदावरी नदीतील पाणी कावडीने पायी आणून येथील गडावरील महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालतात. देवगांव येथील सुद्धा पंचमुखी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नगदेश्वर गडाचे अध्यक्ष नरहरी आगलावे व सरपंच ड़ॉ प्रतिक्षा आगलावे तसेच मठाधिपती महंत श्री परमेश्वर महाराज यांनी यात्रेचे योग्य नियोजन केल्याने भाविकांना शिस्तित दर्शन घेता आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.