कोरोना काळात गावी राहूनच शुभमने घातली यशाला गवसणी

युट्युब, ऑनलाईन प्रणालीचा वापर करीत केले यश संपादन
Shubham Bhosale
Shubham BhosaleSakal
Updated on

औसा (जि.लातूर) - इच्छित साध्य करायचेच या ठाम निर्णयावर आलेल्या माणसाला त्याच्या मार्गात आलेली कुठलीच अडचण त्याला बाधा आणू शकत नाही. याचाच प्रत्यय औसा तालुक्यातील किल्लारी या ग्रामीण भागात राहणाऱ्या शुभम संजय भोसले या तरुणाने कोरोना काळात शिकवणी बंद झाल्या, अभ्यासिका बंद होत्या. प्रत्येकाला जीव वाचीण्याची काळजी असतांना ध्येयाने पछाडलेला शुभम या सर्व अडथळ्यांवर मात करीत होता. त्याने घरच्या घरी बसून युट्युब बघुन आणि ऑनलाइन अभ्यास करीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४९ व्या रँक मध्ये यश संपादन करीत औसा तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला.

लहानपणासुनच शुभम अभ्यासात हुशार होता. वडील संजय भोसले हे शिक्षक असल्याने त्यांच्या ज्ञानाच्या मुशीत त्याची जडणघडण झाली. तुला जे व्हायचे ते हो पण जे होशील त्यावर मला अभिमान वाटला पाहिजे अशी वडिलांची शुभमकडून अपेक्षा होती. प्रशासकीय सेवेत काम करण्याची उर्मी शुभमाला स्वस्थ बसू देत नव्हती. पदवी झाल्यावर त्याने आपला मोर्चा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेकडे वळविला. गेल्या तीन वर्षांपासून शुभम परीक्षेची तयारी करीत होता. गेल्या परीक्षेत चार मार्काने त्याला फायनल यादीत स्थान राखता आले नाही. अपयश पदरात पडले असताना आई बाबांनी त्याला धीर दिला.

प्रत्येक अपयश हे पुढच्या यशाची किल्ली असते हे त्याला पटवून दिले. तो पुन्हा तयारीला लागला मात्र कोरोनच्या कहरात सगळीकडे टाळेबंदी झाली. घरातून बाहेर पडणे कठीण झाले त्याला दिल्ली सोडावी लागली. किल्लारी सारख्या खेडेगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे दिव्य शुभम समोर होते. त्यावर मात करीत घरात बसूनच त्याने युट्युब वर अभ्यासक्रमावर आधारित व्हिडीओ पाहू लागला. गुगलवर सर्च करून माहिती संकलित करून त्याचा अभ्यास सुरू केला. संपूर्ण वर्ष घरातून बाहेर न पडलेला शुभम पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे गेला आणि १४९ वी रँक संपादित करीत त्याने औसा तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला.

लोकाभिमुख प्रशासन चालविण्यावर भर देणार

आलेल्या संकटांना संधी मानत आई वडिलांनी वाढविलेले मनोबलाच्या जोरावर हे यश मिळालेले आहे. या यशामुळे आई बाबांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रूच माझी फलश्रुती आहे. पुढे प्रशासकीय सेवेत काम करीत असताना लोकाभिमुख प्रशासन चालवून प्रशासन आणि लोकांमधील दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे".

- शुभम भोसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.