लातूर: covid 19 vaccination in Latur: अंथरुणास खिळलेल्या तसेच शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्तींना महापालिकेच्या वतीने घरी जाऊन लस दिली जाणार आहे. या संबंधीची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. अंथरुणास खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्ती कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकत नसल्याने त्यांच्या लसीकरणासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून अंथरुणास खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या घरी जाऊन कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा रुग्णांना फक्त कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. अशा नागरिकांसाठी त्यांचे नियमित उपचार करणारे डॉक्टर व फिजिशियन यांचे सदरील व्यक्ती अंथरुणाला खिळून असल्याबाबत व पुढील सहा महिने याच अवस्थेत राहण्याची शक्यता आहे, याप्रमाणे विहित वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. तसेच संबंधित व्यक्ती अथवा त्यांची देखभाल करणाऱ्या घरातील व्यक्तीने व नातेवाइकाने कोविड- १९ प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असल्याबाबत व हरकत नसल्याबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
‘गरजूंनी संपर्क करावा’
वैद्यकीय प्रमाणपत्राची पुर्तता करून अंथरुणास खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरणासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक व पर्यायी संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असल्याचे कारण आदी माहिती लातूर शहर महानगरपालिकेच्या mclatur.covid१९vaccination@gmail.com या ई-मेल संकेतस्थळावर किंवा ९१५८६ ३२३३३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून किंवा आरोग्य विभाग, मनपा कार्यालय लातूर येथे संपर्क करून कळवावी. यातून गरजू नागरिकांच्या लसीकरणाचे पुढील नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.