सिल्लोड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची दारू पिऊन पर्यटकांना शिवीगाळ; अजिंठा व्ह्यू पॉईंट परिसरातील घटना

वन विभागाच्या कर्मचार्‍याने अजिंठा व्ह्यू पॉईंट परिसरात आलेल्या पर्यटकांना अश्लील भाषेत शिविगाळ केल्यामुळे याठिकाणी कुटुंबासहित आलेल्या पर्यटकांनी काढता पाय घेतल्याची घटना रविवारी (ता.21) रोजी व्ह्यू पॉईंट येथे घडली.
सिल्लोड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची दारू पिऊन पर्यटकांना शिवीगाळ; अजिंठा व्ह्यू पॉईंट परिसरातील घटना
सिल्लोड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची दारू पिऊन पर्यटकांना शिवीगाळ; अजिंठा व्ह्यू पॉईंट परिसरातील घटनाSakal
Updated on

सिल्लोड : वन विभागाच्या कर्मचार्‍याने अजिंठा व्ह्यू पॉईंट परिसरात आलेल्या पर्यटकांना अश्लील भाषेत शिविगाळ केल्यामुळे याठिकाणी कुटुंबासहित आलेल्या पर्यटकांनी काढता पाय घेतल्याची घटना रविवारी (ता.21) रोजी व्ह्यू पॉईंट येथे घडली.

वन विभागाचा कर्मचारी फुल्ल दारू पिऊन बोलत असतांनाचा व्हिडिओ अजिंठा येथील एका व्यक्तीने केल्यानंतर त्याने या संदर्भात सकाळच्या प्रतिनिधींना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ते कुटुंबासहित रविवारी व्ह्यू पॉईंट परिसरात गेले होते.

संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परराज्यातील पर्यटक कुटुंबासहित व्ह्यू पॉईंट परिसरात फिरत असतांना वन विभागाच्या कर्मचार्‍याने त्यांना अतिशय खालच्या पातळीवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे महिलांसहित असलेल्या पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला.

याप्रकरणी अजिंठा वन परिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे यांचेशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेबाबत आत्ता मला कळलय माहिती घेतो, माहिती घेतल्यानंतरच बोलतो असे सांगत अर्धवट व्हिडिओ वरती प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. पूर्ण माहिती घेतल्या शिवाय मी काही बोलू शकत नाही असे सांगितले.

दारुड्या वन कर्मचार्‍याची मुजोरी. व्ह्यू पॉईंट परिसरात वन विभागाच्या कर्मचार्‍याने पर्यटक कुटुंबासहित आलेले असतांना त्यांना अश्लील भाषेत केलेल्या शिवीगाळमुळे पर्यटकांनी या परिसरात यावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनेमुळे व्ह्यू पॉईंट परिसरातील पर्यटकांचा ओढा कमी होईल.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची पाठराखण. याविषयी अजिंठा वन परिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे सुरुवातीलाच सकाळच्या प्रतिनिधींना घटनेची माहिती घेतो, परंतू राखीव वन परिक्षेत्रात धूम्रपान, मद्यपान करून कोणी हुल्लडबाजी करीत असेल तर त्यावर आम्ही गुन्हा दाखल करू असे सांगत एक प्रकारे घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे.

कुटुंबासहित आलेले पर्यटक अशाप्रकारे हुल्लडबाजी करतील का आणी असे केले असेल तर जागरूक असलेल्या वनविभागाने त्याचेवर जरूर कारवाई करावी. परंतु मुळात अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी ज्या भाषेत बोलत होते त्यावरून त्यांनी त्या व्हिडिओची मागची पुढची पार्श्वभूमी तुम्हाला माहित आहे का असे उलट विचारणा केली.

त्यांना जर त्या पूर्ण व्हिडिओची पूर्ण माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. आणी यात पर्यटक दोषी असेल तर त्यांचेवर गुन्हा दाखल करावा. परंतु जर वन कर्मचार्‍याने प्रतिबंधित क्षेत्रात दारू पिऊन महिला पर्यटकांसमोर पर्यटकांना अतिशय खालच्या भाषेत शिविगाळ केली ती चालते का याचा विचार संबंधित अधिकाऱ्याने देखील करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.