नांदेड : नांदेड विभागात यंदा गाळप परवाना घेतलेल्या १७ पैकी १२ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. ता. २६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हंगामात आजपर्यंत सहा लाख १९ हजार ३९६ टन उसाचे गाळप झाले आहे. तर पाच लाख ७५ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली.
नांदेड विभागात गाळप हंगाम २०१९ - २०२० मध्ये लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्यांत ता. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी गाळप सुरू झाले. विभागात पाच सहकारी, तर १२ खासगी, अशा १७ कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवाना मागितला होता.
पाच सहकारी व सात खासगी
परंतु, त्यापैकी पाच सहकारी व सात खासगी, असे एकूण १२ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. तर परभणीमधील रेणुका शुगर व महाराष्ट्र शेतकरी हे दोन कारखाने, नांदेडमधील व्यंकटेश्वरा व लातूर जिल्ह्यातील साईबाबा व टेंव्टीवन या दोन, अशा एकूण पाच खासगी कारखान्यांनी अद्याप गाळप सुरू केले नाही.
हिंगोली, परभणीमध्ये साखर उत्पादन सुरू
सुरू झालेल्या साखर कारखान्यांत परभणी जिल्ह्यातील त्रिधारा शुगर या कारखान्याने आजपर्यंत १५ हजार ८९० टन उसाचे गाळप केले आहे, तर योगेश्वरी या कारखान्याने २२ हजार ६६० टन, तर बळिराजा शुगर या कारखान्याने एक लाख दोन हजार १२० टन उसाचे गाळप केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील पहिले गाळप असलेल्या शिऊर या खासगी साखर कारखान्याने ७० हजार ४५१ टन उसाचे गाळप केले आहे. तर सहकारी कारखाना असलेल्या डोंगरकडा येथील भाऊराव चव्हाण (युनिट क्रमांक दोन) या कारखान्याने २५ हजार ९२० टन, पूर्णा सहकारी ५८ हजार ८३० टन, तर टोकाई या कारखान्याने ४४ हजार चारशे टन उसाचे गाळप केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण
नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण (युनिट क्रमांक एक) ४७ हजार १४५ टन, भाऊराव चव्हाण (युनिट क्रमांक चार) ५३ हजार ४८० टन, तर कुंटूरकर शुगर या खासगी कारखान्याने ६४ हजार ८३० टन उसाचे गाळप केले आहे. लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगरने ५३ हजार ४३० टन, जागृती शुगर ६० हजार २४० टन उसाचे गाळप केले आहे. या १२ कारखान्यांनी आजपर्यंत सहा लाख १९ हजार ३९६ टन उसाचे गाळप केले आहे. तर पाच लाख ७५ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.३ टक्के आला आहे.
येथे क्लिक करा--शेतकऱ्याने ‘का’ संपविली जीवनयात्रा
गाळपात बळिराजा शुगर आघाडीवर
नांदेड विभागात ऊस गाळप व साखर उत्पादनात परभणी जिल्ह्यातील बळिराजा शुगर हा खासगी कारखान्याने आघाडी घेतली आहे. विभागात सर्वप्रथम ता. २६ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केलेल्या या कारखान्याने आजपर्यंत एक लाख दोन हजार १२० टन उसाचे गाळप केले आहे, तर साखरेचे उत्पादनही एक लाख तीनशे क्विंटल झाले आहे.
नांदेड विभागातील आजपर्यंतचे गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनमध्ये, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा............ऊस गाळप.........साखर उत्पादन
परभणी..........१, ४०, ६७०........१, २६, ४००
हिंगोली..........१, ९९, ६०१........२, ०४, २५०
नांदेड............१, ६५, ४५५........१, ४७, ९५०
लातूर............१, १३, ६७०............९७, २५०
एकूण............६, १९, ३९६........५, ७५, ८५०
विभागाचा सरासरी साखर उतारा ९.३ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.