Buldana Crime : महिला वाहकास मारहाण करणाऱ्यां तिघांना सहा महिन्याचा कारावास

बसची घंटी का वाजवली व बस थांबण्यावरून वाद होऊन काही लोकांनी बसमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला वाहक कर्मचाऱ्याला मारहाण
Buldana Crime
Buldana Crime sakal
Updated on

बुलडाणा : बसची घंटी का वाजवली व बस थांबण्यावरून वाद होऊन काही लोकांनी बसमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला वाहक कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना 2018 मध्ये शहरातील जयस्तंभ चौकात घडली होती.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ बुलडाणा यांनी आज 30 जून रोजी निकाल देत, महिला वाहकास कर्तव्यावर असताना मारहाण तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन आरोपींना सहा महिन्याची सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Buldana Crime
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा आगारामध्ये लक्ष्मी हरिभाऊ बंड या वाहक पदावर कार्यरत होत्या. 31 मे 2018 रोजी लोणार ते बुलडाणा या बसमध्ये कर्तव्यावर असताना बसमधील प्रवास करणारे अशोक लक्ष्मण मगरे,

मंदाबाई अशोक मगरे व जयश्री ज्ञानेश्वर माळी यांनी बसची घंटी वाजवली व बस थांब्यावरून वाद घालत वाहक लक्ष्मी बंड यांना मारहाण करून शिवीगाळ केली होती.

Buldana Crime
Pune News : चंदीगडच्या देशभगत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. अभिजीत जोशी

या प्रकाराची पोलिसात तक्रार झाल्यानंतर तिन्ही आरोपीवर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर विशेष सरकारी वकील अँड. संतोष खत्री यांनी सरकार पक्षाची बाजू मांडत.सर्व साक्षीदार तपासले आणि घडलेली हकीगत सिद्ध केली.

तिन्ही आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश २ एस. बी. डीगे यांनी आरोपी अशोक मगरे, मंदाबाई मगरे व जयश्री माळी या तिन्हीही आरोपींना सहा महिने साश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा खोटावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.