Hingoli : औंढा-हिंगोली रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक, ६ जण जखमी

दवाखान्यात नातेवाईकांनी आक्रोश केला
Hingoli Accident News
Hingoli Accident Newsesakal
Updated on

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : औंढा-हिंगोली रस्त्यावर सुरेगावजवळ पिकअप व आयशर टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.सात) सायंकाळी चारच्या दरम्याने घडली आहे. पिकअप हा हिंगोली येथुन लग्न आटोपून औंढा नागनाथकडे येत होती तर आयशर टेम्पो (एमएच ०४ व्हीसी ५३९४) हा औंढा येथून हिंगोलीकडे जात असताना सुरेगाव जवळील वळणावर असलेल्या पुलाजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आहे. पिकअपमधील वऱ्हाड हे हिंगोली (Hingoli) वरून रेवनसिंग तांडा येथे जात होते. यातील सहाजण जखमी झाले आहेत. सर्व जखमी रेवनसिंग तांडा येथील आहेत. ते रेवनसिंग तांडा वरुन हिंगोलीला लग्नाला गेले होते. (Six People Injured In Accident On Aundha Nagnath-Hingoli Road)

Hingoli Accident News
जेवण व्यवस्थित करत नसल्याचा राग अनावर, मुलाने घेतला वडिलांचा जीव

जखमींमध्ये रवींद्र राठोड (वय १३), प्रवीण राठोड (१२) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. संतुर राठोड (२०), कृष्णा चव्हाण (२८) यांचे हातपाय तुटले. अजय राठोड (१९) यांच्या डोक्याला मार लागला, तर दिलीप राठोड (५०) यांना मुका मार लागला आहे. तिघे जखमींना संतूर राठोड, कृष्णा राठोड आणि अजय राठोड यांना सुरेगाव येथून ठिकाणाहूनच हिंगोलीला उपचारासाठी नेण्यात आले. रवींद्र राठोड, प्रवीण राठोड, दिलीप राठोड यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण दवाखान्यामध्ये आणण्यात आले. या जखमीमधील रवींद्र राठोड, प्रवीण राठोड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे डॉ गजानन हरण, परिचारीका सविता आमले यांनी प्राथमिक उपचार करून हिंगोलीला रेफर केले आहे. या सर्वांना हिंगोलीला व औंढा (Aundha Nagnath) येथील ग्रामीण दवाखान्यात आणण्यासाठी माजी नगरसेवक शकील अहमद, बबनराव हांडे, प्रमोद देशपांडे यांनी मदत केली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच औंढा पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, गणेश गायकवाड, राजकुमार कुटे, ज्ञानेश्वर गोरे, राजकुमार सूर्वे, सचिन मस्के, किसन आठवले यांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील जखमींना ग्रामीण दवाखान्यांमध्ये आणले.

Hingoli Accident News
औरंगाबादेत गुंडांचा धुमाकुळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, डोक्याला पडले ७० टाके

औंढा येथून जखमींना १०८ रुग्णवाहिकेमध्ये हिंगोलीला नेण्यात आले. यावेळी औंढा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रदीप कनकुटे, सचिन राठोड, शंकर काळे, रवि पवार आधी येऊन यांनीही मदत केली. रुग्णवाहिका लवकर न आल्याने खासगी वाहनातून जखमींना नेत असताना काही वेळामध्ये रुग्णवाहिका आली. त्या मध्येच जखमींना नेण्यात आले.औंढा दवाखान्यात नातेवाईकांनी आक्रोश केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()