Soybean Crop : सोयाबीन पिकावर गोगलगायीचे संकट; पावसाच्या अनियमितपणामुळे पेरण्या लांबल्या

कसगीच्या शेतकऱ्याने गोगलगाय घेऊन आमदारासमोर मांडली व्यथा
soybean farmer
soybean farmeresakal
Updated on

उमरगा : जेमतेम पावसावर पेरणी केलेल्या क्षेत्रावरील पिकांची वाढ होत आहे. मात्र सोयाबीनसह अन्य पिकांवर विविध किडरोगाचा धोका असतानाच गतवर्षीप्रमाणे यंदाही गोगलगायीचे आक्रमण सुरू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान कसगीचे शेतकरी नांगीनधर बाबू जमादार यांनी शनिवारी (ता.२२) गोगलगाय जमा करून प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी आणले.

सुट्टीचा दिवस असल्याने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयात कॅरिबॅगमध्ये जमा केलेल्या गोगलगायी दाखवल्या. तालुक्यात यंदा पावसाच्या अनियमितपणामुळे पेरण्या लांबल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने कांही भागात पेरण्या झाल्या. ओल कमी असतानाही बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.

गोगलगायचे प्रमाण पूर्वी अगदी अत्यल्प होते यंदा त्याचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. सोयाबिनवर गोगलगायीचे आक्रमण दिसून येत आहे, त्यासाठी शेताचे बांध स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी.

पिकाच्या मुळाशेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची (१०० ते १५० च्या पुंजक्यात) साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. बांधाच्या शेजारी चार इंच रुंदीचा तंबाखू किंवा चुन्याच्या भुकटीचा पट्टा टाकावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर यांनी केले आहे.

soybean farmer
Solapur Crime News : माजी आमदारपुत्राची २५ लाखांची फसवणूक

शेतकऱ्याची प्रशासनाकडे हाक 

कसगीचे शेतकरी नांगीनधर जमादार यांच्या सहा एकर क्षेत्रात गोगलगायीची संख्या वाढली आहे. कोवळ्या पिकांचे होत असलेल्या नुकसानीने व्यथित झालेले श्री.जमादार यांनी गोगलगाय एकत्रित जमा करून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी शनिवारी उमरग्यात आले होते.

कार्यालयाला सुट्टी असल्याने ते आमदार ज्ञानराज चौगुले यांची संपर्क कार्यालयात भेट घेऊन व्यथा मांडली. आमदार चौगुले यांनी कृषी अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी करून उपाययोजना संदर्भात सूचना केली.

soybean farmer
Solapur News : दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यसंस्काराची वेळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.