माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना संगीत रसिकाग्रणी पुरस्कार जाहीर

Diliparo Deshmukh News, Latur
Diliparo Deshmukh News, Latur
Updated on

लातूर ः येथील मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटरच्या वतीने अभिजात भारतीय संगीत क्षेत्रात संगीत कला प्रसारासाठी ज्यांचे अनमोल योगदान लाभले अशा संगीत रसिकांना दरवर्षी ज्येष्ठ संगीत रसिकाग्रणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीच्या या पुरस्कारासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आल्याची माहिती मराठवाडा संगीत कला अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ.राम बोरगावकर यांनी दिली.


या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये पं.नाथराव नेरळकर, शुभदा पराडकर व पं.वसंतराव शिरभाते या त्रिसदस्यीय समितीने श्री.देशमुख यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. श्री.देशमुख यांनी मागील तीन ते चार दशके लातूर व मराठवाडा परिसरात अभिजात संगीताची जोपासना करणाऱ्या कलावंतांना तसेच संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच ते स्वतः सूर व तालाचे जाणकार मर्मज्ञ आहेत. त्यांच्या रसिकतेबाबत भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांनी गौरवोद्गार काढले होते. १९९६ मध्ये लोकनेते विलासराव देशमुख यांनाही अकादमीच्या वतीने या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी गायिका कविता कृष्णमूर्ती व पं.सुरेश वाडकर यांची उपस्थिती होती. या पुरस्काराचे वितरण कोरोनाचे संकट गेल्यानंतर एका जाहीर संगीत समारंभात मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगांवकर व पं. सुरमणी बाबुराव बोरगांवकर यांनी दिली.

वाचा ः  एक घास मुक्या जीवांसाठी ! उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा उपक्रम


`मांजरा`तर्फे सामाजिक उपक्रम
लोकनेते विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शनिवारी (ता.१८) कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कारखान्याच्या वतीने मांजरेश्वर हनुमान मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मांजरा शुगर पॉवर हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन व विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. तसेच कारखानास्थळी वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मातोश्री वृद्धाश्रमात स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखत हे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व खातेप्रमुख उपस्थित होते.

एकशे एक जणांनी केले रक्तदान
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक अंतर पाळत बँकेचे कर्मचारी व अधिकारी असे एकूण १०१ जणांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबिरात बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाठ, संचालक अॅड. प्रमोद जाधव, स्वयंप्रभा पाटील यांनी रक्तदान केले. यावेळी बँकेचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे, संचालक एस. आर. देशमुख, संभाजी सूळ, भगवान पाटील विजयनगरकर, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव उपस्थित होते. उदगीर येथील बँकेच्या शाखेत ४० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी सरव्यवस्थापक एस. जी. उगिले, मिलिंद देशपांडे, वसुली व्यवस्थापक तानाजी जाधव, आस्थापना व्यवस्थापक एस. जी. सांगवे, शरद मुळे, माध्यम प्रमुख हरिराम कुलकर्णी, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.