Beed News : आतापर्यंत नऊ लाख क्विंटल साखर उत्पादन

कमी पावसामुळे उत्पादन घटले : सहा कारखान्यांकडून १४ लाख टन गाळप
Beed
Beedsakal
Updated on

माजलगाव : मागील तीन वर्षांपासून होणाऱ्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढले होते; परंतु यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्यस्थितीत बीड जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी १३ लाख ७५ हजार ३११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, सरासरी ९.५७ साखर उताऱ्यानुसार एकूण नऊ लाख २० हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यात झाले आहे. यासह जिल्ह्यात सुरु असलेल्या गूळ पावडर उद्योगालाही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे.

गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका यासारख्या नद्या जिल्ह्यातून गेल्या असून, मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेले माजलगाव धरण, बिंदुसरा प्रकल्प, कुंडलिका प्रकल्प जिल्ह्यात आहेत. याशिवाय गोदावरी नदीवर बांधलेल्या उच्चपातळी बंधाऱ्याचा लाभही गेवराई, माजलगाव, परळी सारख्या तालुक्याला मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त भागातील शेती पाण्याखाली येत असल्याने ग्रीन बेल्ट म्हणून जिल्ह्याची ओळख आहे.

Beed
Manoj Jarange यांच्या Beed येथील वादळी सभेनंतर Chhagan Bhujbal आक्रमक

दरवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या पाण्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यासाठी साखर कारखान्यांची संख्याही सर्वाधिक आहे. यंदा जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असून, इतर कारखाने बंद आहेत. सध्यस्थितीत लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (तेलगाव, ता. धारूर), जय महेश साखर कारखाना (एनएसएल शुगर्स) पवारवाडी (ता. माजलगाव), छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव (ता. माजलगाव), जय भवानी साखर कारखाना (गढी, ता. गेवराई), गंगा माऊली साखर कारखाना (केज), येडेश्वरी साखर कारखाना (केज) या सहा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असून, या कारखान्यांनी शनिवारपर्यंत (ता. २२) १३ लाख ७५ हजार ३११ मेट्रिक टन उसाचे गाळप करत, सरासरी ९.५७ साखर उताऱ्यासह एकूण नऊ लाख २० हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

गूळ पावडर उद्योग तेजीत

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ऊस लागवडीमुळे साखर कारखान्यांसह गूळ पावडर उद्योगही मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. जिल्ह्यात गूळ पावडर निर्मितीचे जवळपास १० युनिट असून, यासाठीही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे. माजलगाव तालुक्यातील यु. के. फार्मर गूळ युनिटने ३० हजार मे.ट. उसाचे गाळप करत ३८ क्विंटल ४०० किलो गूळ पावडरचे उत्पादन केले आहे. ५४ लाख लिटर इथेनॉल, एक कोटी युनिट वीजनिर्मिती

कारखान्याचा नफा वाढविण्यासह शेतकऱ्यांनाही एफआरपी पेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी अनेक कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीचे युनिट उभारले आहे. जिल्ह्यातील एकूण साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मित प्रकल्पातून एकूण ५३ लाख ५७ हजार १०९ लिटर इथेनॉल तर, ९८ लाख ६५ हजार ९९४ युनिट वीजनिर्मिती झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()