खड्डेमुक्तासाठी सरसावले सामाजिक कार्यकर्त्यांचे हात
कळमनुरी ः खराब रस्ते, वाहनांची वर्दळ अन् त्यातुन होणारे अपघात यामुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना अवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदतीचा हात वेळेवर मिळणे गरजेचे असते. खड्डेमुक्त रस्ते करणार या शासनाच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून कामे होत नसल्याने अपघात होऊच नये, यासाठी पुढाकार घेणारे हात म्हणुन सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वाःस सोडला.
शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे होत असलेले छोटे-मोठे अपघात व या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष पाहता शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवार (ता.सात) एकत्र येत श्रमदानामधून अपघातग्रस्त रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले आहेत.
हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा मार्ग अपघातग्रस्त मार्ग म्हणून ओळखला जात आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्या करिता आंदोलनही झाले. मात्र, संबंधित विभागाने खानापूर सावरखेडा याठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची डांबर टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र, उमरा व शहरामधून जाणाऱ्या रामचंद्र महाराज मंदिर, मोरवाडी, माळेगाव फाटा, या ठिकाणच्या मार्गावर पडलेल्या असंख्य मोठ-मोठ्या खड्ड्यात पांढरी माती टाकून थातूर मातुर दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे वर्दळीच्या या मार्गावरील खड्यांची मालिका नियमित राहिली. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली व वाहन चालकांनाही या मार्गावरून वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे.
संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष
रामचंद्र महाराज मंदिराजवळील चढ व वळण रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे याठिकाणी नियमित वाढलेले छोटे-मोठे अपघाताचे प्रमाण व संबंधित विभागाने याकडे चालवलेले दुर्लक्ष पाहून संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यामधून स्वतः मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - Video : पोलिसशस्त्रांच्या माहितीचे विद्यार्थ्यांना कुतूहल
यांनी घेतला पुढाकार
मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश पाचपुते, नागोराव खुडे, उमाकांत शेवाळकर, बबन डुकरे, बबन बर्गे, शेख मतीन, शंकर फोपसे, भारत धनवे, हाफिज बागवान, अयाज नाईक, सचिन बोडके यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकत्र येत याठिकाणी चार ट्रीप ट्रॅक्टर मुरूम विकत मागवून या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या वळण रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे अपघातासाठी व वाहतुकीसाठी अवघड झालेला हा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.
खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’
राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खड्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटीस देत सुनावणी घेतली होती. मात्र, यानंतर ठराविक ठिकाणी डांबर टाकून खड्डे दुरुस्ती करण्यात आली. इतरत्र मार्गावरील खड्ड्यामध्ये माती टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्यात आल्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.