परभणी : पावसाच्या हलक्या सरीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे. आतापर्यंत तीन लाख ६७ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी झाली आहे. अजूनही दीड लाख हेक्टरवरील क्षेत्र पेरणीविना आहे. एकूण ७१.१५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली आहे.
जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन जोरदार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या होत्या. परंतु, मध्येच पावसाने हुलकावनी दिल्याने पेरण्यांना ब्रेक मिळाला होता. पुन्हा हलक्या सरींनी अधूनमधून हजेरी लागू लागल्याने आणि पेरणीची योग्य वेळ निघून जात असल्याने शेतकऱ्यांना आहे त्या ओलीवर पेरण्या सुरू केल्या आहेत. आता पेरण्यांना वेग आला असला तरी शेतकरी निसर्गावर विश्वास ठेवून पेरणी करत आहेत. यंदा निसर्गाच्या संकटासोबतच बोगस बियाणाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहेत.
पाच लाख १७ हजार १४२.६५ हेक्टर प्रस्तावित
अनेक तालुक्यात पेरणी केलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या बाबत कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी पाच लाख १७ हजार १४२.६५ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशी ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदाच्या हंगामासाठी सोयाबीन दोन लाख १९ हजार २०२ हेक्टर, कपाशी एक लाख ८५ हजार ७२ हेक्टर, तूर ५० हजार ६०८ हेक्टर, मूग ३३ हजार ९९८.९५ हेक्टर, उडीद ११ हजार ६७५.९६ असे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
सव्वालाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी
सोयाबीनची दोन लाख १९ हजार २०२ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ६५ हजार २३५ हेक्टरवर पूर्ण झाली आहे. तुरीची ३२ हजार ९५१, मूग २६ हजार ९३६, उडीद पाच हजार ५१७ हेक्टरवर पेरणी झाला आहे. खरीप ज्वारीची तीन हजार ७८७ हेक्टरवर, बाजरी २४९ हेक्टर, कपाशी एक लाख ४२ हजार ४९३ लागवड झाली आहे.
हेही वाचा : सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का...?
तालुका पेरणी टक्के
परभणी ६६ हजार १६० ६८.५७
गंगाखेड ३७ हजार ५३८ ६८.६७
सोनपेठ २७ हजार ९७५ ८०.४९
पालम २९ हजार २८७ ६३.६१
पाथरी २६ हजार ८८० ५८.५४
मानवत ३६ हजार ८०९ ८८.३७
जिंतूर ७३ हजार ९६२ ८७.८४
पूर्णा २९ हजार १७९ ५२.६१
सेलू ४० हजार १५७ ६९.२८
एकुण-३ लाख ६७ हजार ९४७ (७१.१५ टक्के)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.