मोदींच्या आशीर्वादाने सोयाबीनचे दर पडले : ओमप्रकाश राजेनिंबाळकर

ओमप्रकाश राजेनिंबाळकर
ओमप्रकाश राजेनिंबाळकर
Updated on

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेण्याचे पाप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असुन तुमचे पाप कोणत्याच पवित्र नदीत धुवुन निघणार नसल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी टीका केली आहे. मोदी यांच्या आशीर्वादानेच सोयाबीनचे दर कोसळत असुन केंद्र सरकारने 12 लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याचा घणाघात श्री. निंबाळकर यांनी केला आहे. मोदी सरकारच्या अनेक निर्णयामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागत आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार करत असल्यामुळेच शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले आहे. सोयाबीन दरामध्ये होत असलेली घट पाहता सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी 10 ते अकरा हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजारावर आले आहेत.

ओमप्रकाश राजेनिंबाळकर
घरी परताना घात! दोघा तरुणांचा मृत्यू, प्रशिक्षणार्थी पोलिस जखमी

एका बाजुला यंदा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला असुन अगोदरच उत्पन्नात घट झाली आहे. एकरी उतारा घटल्याने अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दराच्या घसरणीचाही तोटा होत आहे. सोयाबीन पिकातून उत्पन्नाची आशा असतानाच केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडशी आलेला घासच हिरावुन घेतल्याचे खासदार ओमराजे यांनी म्हटले आहे. सोयाबीनचे भाव यंदा दहा हजाराच्यावर राहतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्याप्रमाणे भावही चढे राहिले होते, जेव्हा केंद्राने आयातीचा निर्णय जाहीर करण्याचा विचार चालु केला त्याच दिवसापासुन आतापर्यंत हळुहळु दर कोसळत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे महापाप भाजपच्या सरकारने केले आहे. हे पाप देशाच्या कोणत्याही पवित्र नदीत धुवुन निघणार नाही असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.