माकणी : धानुरी (ता. लोहारा) येथील शेतामध्ये ड्रोनद्वारे सोयाबीनची फवारणी शुक्रवारी (ता. नऊ) करण्यात आली. लोहारा तालुक्यात प्रथमच ड्रोनने फवारणी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती, तसेच फवारणीचे कुतूहलही होते. .धानुरी आणि परिसरात या वर्षी सुरवातीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग ही पिके चांगली बहरली आहेत. मात्र, गेली काही दिवसांपासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर रोग व विविध प्रकारच्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या पिकांना जगवण्यासाठी शेतकरी कसरत करत आहेत..Ambegaon Drone News: ड्रोनच्या घिरट्या अन् चोरीच्या घटना; आंबेगावच्या पूर्व भागातील सत्र थांबेना...रोग व आळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशक, अन्नघटक या औषधांची फवारणी केली जात आहे. मात्र, फवारणीसाठी मजुरांची चणचण जाणवत आहे. त्यातच अधूनमधून पावसाचा जोर आहे. त्यामुळे वेळेत फवारणी करणे कठीण झाले आहे. पर्यायाने शेतकऱ्यांच्या मागणीमुळे लोहारा येथील गजानन आणि जगदंबा कृषी सेवा केंद्राकडून भाडेतत्त्वावर फवारणीसाठी ड्रोन फवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. धानुरी येथील शेतकरी व्यंकट साळुंके यांच्या शेतात प्रथमच ड्रोन फवारा वापरून सोयाबीन पिकावर फवारणी करण्यात आली. .Jalgaon Drone Farming : ‘ड्रोन’ फवारणीमुळे वेळ, पाणी, औषध अन् पैशांची बचत! बोदवड परिसरात एकरी 300 रुपये भाडे.केदार जट्टे यांनी ड्रोन फवारा आॕपरेट केला. लोहारा तालुक्यात प्रथमच ड्रोन फवारा वापरण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांतही याबाबत कुतूहल होते.यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडल्याने सोयाबीनचे पीकही जोमात आले आहे. मात्र, पिकावरील रोग आणि अळीवर नियंत्रण आणण्यासाठी औषधांची फवारणी करणे गरजेचे होते. त्यासाठी मजूर मिळणे अवघड झाले. त्यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणीचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फवारणी केली असून ती चांगल्या पद्धतीने झाली आहे.- व्यंकट साळुंके, शेतकरी, धानुरी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.