एसटी कर्मचारी झाडावर चढल्याने कळंबमध्ये गोंधळ,गळ्याला लावला फास

एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्याकरिता महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे.
Osmanabad News
Osmanabad Newsesakal
Updated on

कळंब (जि.उस्मानाबाद) : एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्याकरिता महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे. येथील आगाराचे कर्मचारी सच्छिदानंद पुरी हे सोमवारी (ता.एक) पहाटे सहा वाजल्यापासून झाडावर चढून गळ्याला फास लावून बसले आहेत. दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी रविवारी मध्यस्थी करत आंदोलकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्यास करण्यात आलेली शिष्टाई फेल ठरली आहे. गेल्या चार (ST Workers Strike) दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृती समितीच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांच्या समवेत केलेली चर्चा फिस्कटली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची कृती समिती निर्णय घेणार कोण? कर्मचाऱ्यांना विश्वसात न घेतलेला निर्णय अमान्य असल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. आमदारांनी एसटीच्या कळंब आगारातील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन माहिती जाणून घेत एसटीच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली.

Osmanabad News
लोक पंतप्रधान मोदी,भाजपवर संतापले; देश विकला जातोयचा सूर

सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होत एसटीची चाके फिरविली. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास कर्मचारी पुरी आगारातील झाडावर चढून गळ्याला फास लावून बसल्याने एकच गोंधळ उडाला. आगारप्रमुख मुकेश कोमटवार, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, नायब तहसीलदार भुरके, भाजपचे तालुकाप्रमुख अजित पिंगळे, शहरप्रमुख संदीप बविकर,एसटीच्या कर्मचाऱ्यांनी गळ्याला फास लावून बसलेले पुरी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. पण एसटी महामंडळाचे शासनात विलगिकरण करा, आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करू नये, या मागण्यांवर ठाम असून मागण्याची पूर्तता केल्यानंतरच आपण झाडावरील खाली उतरू आत्महत्या करणार नसल्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे कर्मचारी पुरी यांनी सांगितले.

एसटी बंद, प्रवासाची तारांबळ

मागच्या दोन दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने एसटी फिरू लागली होती. काही कर्मचाऱ्याच्या संघटनेत फूट पडल्याने गोंधळ उडाला आहे. येथील आगारातील बस विविध मार्गावर धावल्या होत्या. त्यामुळे एसटीची चाके सुरळीत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी सुरू झालेल्या आंदोलनामुळे आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.