किल्लारी (जि.लातूर) : गेल्या दीड महिन्यापासून लातुर जिल्ह्यात एसटीचे शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू असताना कालपासून जिल्ह्यात बसेस सुरू झाल्या. मात्र सोमवारी (ता.१३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लातुर-निलंगा बसला जाऊवाडी पाटीजवळ (ता.निलंगा) अज्ञात व्यक्तीने तोंडावर कपडा बांधून दुचाकी वरून येऊन चालत्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार दुपारी बारा वाजता लातूर-निलंगा ही बस (एमएच २० बीएल २०१७) लातुर (Latur) ते निलंगा प्रवास करत होती. बसमध्ये चालक जयशंकर गुरुलिंग स्वामी, वाहक संजय बाबूराव स्वामी यांच्यासह ३४ प्रवाशी प्रवास करत होते. (ST Strike Latur Updates Stone Pelting On Latur-Nilanga Bus)
लामजना पाटी ते निलंगा दरम्यान जाऊवाडी पाटीजवळ अज्ञात मोटरसायकल चालकांनी येऊन बसच्या काचावर दगडफेक केली. यात समोरील काच आणि ड्रायव्हर बाजूच्या शेवटच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. यावेळी बसमध्ये एकूण ३४ प्रवासी प्रवास करित होते. सदरील घटना साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात अंदाजे नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी बसवर दगडफेक केली. मोटरसायकलचे नंबर प्लेट पांढऱ्या रंगाचे होते. पुढील तक्रार किल्लारी ठाण्यात देत आहोत.
- जयशंकर स्वामी, एसटी चालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.