पाचोड - निर्दयी सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, आणखी दोन-तीन दिवस उलटले तर त्यांना काही दिसणार नाही.
मात्र आम्ही सरकारकडे आग्रही भूमिका मांडू, सरकारने निवडणूकीच्या तोंडावर तरी सकारत्मकता दाखवावी असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (ता. चार) पाचोड (ता. पैठण) येथे नुकसानग्रस्त शेताच्या पाहणी प्रसंगी केले.