‘यांना’ राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : काही वर्षापूर्वी ‘जिम्नॅस्टिक’ हा खेळप्रकार काय असतो याबद्दल नांदेड शहरात फारसा गवगवा नव्हता. मात्र कराटेचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका युवकाला ‘जिम्नॅस्टिक’ या क्रीडा प्रकाराबद्दल माहिती मिळाली. आणि त्यांने कुठलीही संधी न दवडता कुणाच्याही मदतीशिवाय २००३ साली मुंबई गाठली व जिम्नॅस्टिकचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यांनी मुंबईहून परतल्यानंतर शहरातील मुलांसाठी ‘जिम्नॅस्टिक’ वर्ग सुरु केले. बघता बघता हा खेळ नांदेडपासून राष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे. आशा या हरहुण्णरी प्राध्यापकास राज्यस्तरीय क्रीडा रत्नपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 
महाराष्ट्रात जिम्नॅस्टिक या खेळ प्रकारात मागील १५ वर्षापासून हजारों विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम प्रा.जयपाल रेड्डी हे करीत अहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रा. रेड्डी यांनी जिल्ह्याचे नाव जिम्नॅस्टिक खेळात राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गांधी - आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी संघटनेने प्रा. रेड्डी यांना शुक्रवारी (ता.तिन) नांदेड (दक्षिण) आमदार मोहन हंबर्डे, नांदेड (उत्तर)चे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याहस्ते त्यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

मराठवाड्यात इथे जिम्नॅस्टिक

जिम्नॅस्टिक खेळामुळे आज अनेक मुले राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय पातळीवर पोहचले असले तरी, त्या मानाने मराठवाडा या खेळात आजही मागेच असल्याचे दिसून येते. सध्या जिम्नॅस्टिक हा खेळ प्रकाराचे प्रशिक्षण औरंगाबाद, नांदेड आणि काही प्रमाणात परभणी या शहरात दिले जाते. या तिन्ही जिल्ह्यात प्रामुख्याने अक्रोब्याटीक्स, एरोबिक्स, ट्रम्पलीन व थम्बलिंग, आर्टीस्टिकस या खेळ प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र एरोबिक्स जिम्नॅस्टिक प्रकारात औरंगाबाद जिल्हा तर ट्रम्पलीन व थम्बलिंग क्रीडा प्रकारात नांदेड जिल्ह्याचे वर्चस्व आहे.

महाराष्ट्राच्या प्रमुख प्रशिक्षकाची जवाबदारी
प्रा. जयपाल रेड्डी यांनी या पूर्वीच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारातील पंच म्हणून त्यांनी परीक्षा पास केल्याने त्यांना जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात पंच म्हणून त्यांनी महत्वाची भुमिका निभावली आहे. सध्या स्थितीत ते महाराष्‍ट्राचे जिम्नॅस्टिक क्रीडा प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम बजावत आहेत. 

गांधी - आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार संघटनेकडून सन्मानित 
गांधी - आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू गोडबोले व प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सावित्री जोशी यांच्या उपस्थितीत प्रा. जयपाल रेड्डी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. रेड्डी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिम्नॅस्टिकस संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय शेटे, सचिव मकरंद जोशी, कोषाध्यक्ष पवन भोईर, नांदेड जिम्नॅस्टिकस संघटनेचे चेअरमन डॉ. हंसराज वैद्य, कार्यअध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर, अध्यक्ष दत्तात्रेय पाटील गोजेगांकर, वीरेंद्र सिंघ गाडीवाले, डॉ. रवी सरोदे, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, डॉ. दिनेश निखाते, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रमेश पारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जे. ई.गोपीले, डॉ. शितल भालके यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.