औरंगाबाद: कोरोनाच्या (covid 19 impact on st bus) दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवार (ता. दोन) पासून एसटी बस वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बस सुरु होऊनही प्रवाशांनी पाठ फिरवली होती. मात्र, आता सर्वच मार्गांवर कोरोनाचे नियम पाळून शंभर टक्के बसगाड्या सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
१ जूनपासून काही प्रमाणात निर्बंध कमी केल्यानंतर पुन्हा एसटी बस सुरु करण्यात आली. तरीही प्रवाशी मात्र एसटीकडे फिरकला नाही. अत्यंत कमी प्रवाशी घेऊन एसटी बस सुरु झाली. बुधवारी (ता. दोन) मध्यवर्ती बसस्थानकातून केवळ ११ बस विविध शहरांसाठी सोडण्यात आल्या. त्यात एका बसमधून प्रत्येकी २२ प्रमाणे ४०० च्या जवळपास प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. गुरुवारी (ता. तीन) दिवसभरात केवळ आठशे ते नऊशे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे.
शुक्रवारी (ता. चार) केवळ ३८ बस धावल्या तर शनिवारी (ता. पाच) चाळीस बसमधून प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. सोमवारपासून औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकातून सर्व मार्गावर बस सुरु करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, जळगाव, धुळे, नाशिक, बुलढाणा, बीड, नांदेड, परभणी, अकोला, नागपूर आशा बहुतांश मार्गावर बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार सोमवारपासून सर्वच शहरांसाठी बसगाड्या सुरु करण्यात येत आहेत. कोरोनाची नियमावली पाळून या बसगाड्या धावणार आहेत. एसटी प्रवाशांना ई-पासची गरज राहणार नाही, त्यामुळेच प्रवाशांना या बससेवेचा लाभ घ्यावा.
-अरुण सिया, विभाग नियंत्रक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.