आज ठरणार येथील ‘कारभारी’

karbhari
karbhari
Updated on

परभणी ः जिल्ह्यात नऊ पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी (ता.२७) होणार आहे. त्यासाठी सर्व तालुक्यातील राजकारण ढवळुन निघाले असून परभणी, गंगाखेड, पूर्णा येथील बहुमत नसलेल्या पंचायत समितीमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे.
मागील कार्यकाळात ता.१४ मार्च २०१७ रोजी पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींच्या निवडी झाल्या होत्या. त्यांची मुदत सप्टेंबर महिण्यात संपणार होती. विधानसभा निवडणुकीमुळे २३ ऑगस्ट रोजी १२० दिवसांची मिळालेली मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपणार आहे. परभणी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे आठ, शिवसेना आठ, भाजपा तीन व माकप एक विद्यमान सभापती म्हणून असे सदस्य आहेत. सभापती म्हणून कॉँग्रेसच्या लताबाई बेले तर उपसभापतीपदी भाजपचे ग्यानदेव दंडवते हे काम पाहत आहेत. निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने कॉँग्रेस आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. 


परभणीत शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा
सध्या शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा असून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यात लक्ष घातले आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या आठ सदस्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत भाजपचे दोन सदस्य असल्याची चर्चा आहे. तर कॉँग्रेसकडे आठ सदस्यांसह भाजपचा एक आणि माकपचे एक असे सदस्य असल्याने शिवसेना आणि कॉँग्रेसकडे सध्या प्रत्येकी दहाचे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणत्या घडामोडी होतात याकडे लक्ष लागले आहे. सभापतीपद कोणाला याचा निर्णय देखील गुलदस्त्यात शिवसेनेकडून पिंगळी सर्कलच्या गोकर्णा भानुदास डुबे तर कॉँग्रेसकडे जांब सर्कलच्या अर्चना धनंजय सोनटक्के यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागास प्रर्वगासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

गंगाखेड पंचायत समितीकडे लक्ष
गंगाखेड पंचायत समितीमध्ये एकाही पक्षाला स्पष्ट असे बहुमत नसल्याने तेथे काय होणार याकडे लक्ष लागले आहे. गंगाखेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पाच, शिवसेना तीन, कॉँग्रेस एक, रासप तीन व भाजपा दोन असे पक्षीय बल आहे. मागील निवडीच्यावेळी रासपने शिवसेना आणि भाजपाच्या मदतीने सत्तास्थापन करुन उषा पोले यांना संधी दिली होती. आता राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. असे असले तरी रासपाने शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या सदस्यांना सहलीवर पाठविल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला आहे. त्यामुळे शुक्रवारी काय होतेय याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा...या जिल्ह्यात दिवसाही काळोखच


पालम, पूर्णेत शिवसेनेचा सभापती होण्याची दाट शक्यता 
सोनपेठ, पाथरी, जिंतुर, सेलू येथे राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असल्याने तेथे उलथापालथीची शक्यता कमी आहे. तर पालम आणि पूर्णा येथे शिवसेनेकडे सर्वाधिक सहा सदस्य असल्याने यावेळेस शिवसेनेचा सभापती होण्याची दाट शक्यता आहे. मागील वेळी राष्ट्रवादीने भाजपा व कॉंग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करत शिवसेना बाजुला केले होते. यावेळेस चित्र बदलले आहे. पालम पंचायत समितीच्या आठ सदस्यामध्ये घनदाट मित्रमंडळ तीन, राष्ट्रवादी कॉँग्रेस दोन, भाजपा दोन व रासपाचा एक सदस्य आहे. घनदाट मित्रमंडळाच्या सदस्या सावित्री सोडनर, उपसभापती राष्ट्रवादीचे रत्नाकर शिंदे हे कार्यरत आहेत. यावेळेस समिकरणे बदलतात की पुर्वीचा पॅटर्न कायम राहतो, याकडे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.