Latur : नळेगाव येथे कडकडीत बंद ; वलांडी येथे चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेचा निषेध

देवणी तालुक्‍यातील वलांडी येथील एका सहा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २९) नळेगाव (ता.चाकूर ) येथे बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन आंदोलन करण्यात आले.
latur
latursakal
Updated on

नळेगाव : देवणी तालुक्‍यातील वलांडी येथील एका सहा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २९) नळेगाव (ता.चाकूर ) येथे बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन आंदोलन करण्यात आले.

वलांडी येथील अल्पवयीन चिमुरड्या मुलीवर सतत पाच दिवस अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सोसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नळेगाव येथे करण्यात आली. ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी एकत्र येत येथील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकात निषेधाचे फलक दाखवत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला.

latur
Latur News : लातूर जिल्ह्यात अनेक शाळांना कुलूप ; जिल्हा परिषदेचे शिक्षक सर्वेक्षणावर गेल्याने विद्यार्थी वाऱ्यावर

पोलिस प्रशासनाने घटनेचा जलदगतीने तपास करावा व आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी करीत पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे व तलाठी प्रशांत तेरकर यांना निवेदन दिले.या निवेदनावर वीर योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजणकर, प्रदेशाध्यक्ष हिंदू खाटीक संघटनेचे रोहित राजेंद्र थोरात, अमोल सोमवंशी, शिवसेना तालुका उपप्रमुख राहुल घोणे, तानाजी आदमाने, भैरव गायकवाड, महादेव काथवटे, त्र्यंबक काथवटे, राम आदमाने, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष शाम सावंत, सुनील आदमाने, संभाजी घोणे, संजय सौदागर, ज्ञानोबा काथवटे, काशीनाथ काथवटे, विजय टोम्पे, सुभाष वंजारे, डिगांबर काथवटे, नवनाथ आदमाने, अनिल जाधव, बबलू फुलारी, मनोज धविले यांच्या सह्या आहेत.

शिरूर अनंतपाळ येथे निवेदन

शिरूर अनंतपाळ : वलांडी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत हिंदू खाटीक समाज संघटनेच्या वतीने निवेदन तहसीलदार काशीनाथ पाटील व पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांना देण्यात आले.निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष महादेव टोम्पे, उपाध्यक्ष संतोष गंगणे, सचिव बालाजी सांडवे , महेश विजापुरे, विठ्ठल सांडवे, ज्ञानोबा घोलप,ज्ञानोबा गंगणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चाकूर शहरात बंदसह निषेध फेरी

चाकूर: वलांडी (ता.देवणी) येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२९) विविध संघटनाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे बाजारपेठ कडकडीत बंद होती. सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध फेरी काढण्यात आली. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याच्या घोषणा देण्यात आल्या. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत निषेध आंदोलनात सहभागी नोंदविला. शहरातील शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले होते. पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.