विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला न्यायव्यवस्थेचा पाठ

फोटो
फोटो
Updated on

सगरोळी, (ता.बिलोली)ः शाळेत विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र विषयात त्यांचे हक्क व अधिकार या विषयाचे धडे मिळतात. भारतीय न्याय व्यवस्थेची रचना व त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळते. परंतु, प्रत्यक्षात न्यायालयीन कामकाज कशा पद्धतीने चालते याचा अनुभव घेतल्यास विद्यार्थ्यांना आरोपी, वकील व न्यायाधीशांची भूमिका व न्यायालयीन प्रक्रिया सहजपणे समजावी यासाठी सगरोळी (ता. बिलोली) येथील राजर्षी श्री. छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाच्या आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. १८) बिलोली येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयास भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती व अनुभव घेतला.

मुलांनी प्रत्यक्ष न्याय व्यवस्थेचा अनुभव घेतला
आठव्या वर्गातील इतिहास, नागरिकशास्त्र विषयातील भारतीय न्यायव्यवस्था या पाठाच्या अनुषंगाने बिलोली येथील जिल्हा अतिरिक्त सत्र नायालयास क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या भेटी दरम्यान, मुलांनी प्रत्यक्ष न्याय व्यवस्थेचा अनुभव घेतला व आपल्या मानातील शंकांचे निरसन केले. तसेच संपूर्ण न्याय प्रक्रिया कशी असते ती समजून घेतली, गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते, युक्तिवाद, सुनावणी याची माहिती घेतली. पूर्ण दिवस न्यायालायातील अधिकारी, वकील संघ, लिपिक वर्ग यांच्या मुलाखती घेऊन न्यायालीन कागदपत्रांचीही माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. या क्षेत्रभेटी वेळी ४९ विद्यार्थी, विषय शिक्षक मंगेश कुलकर्णी व सचिन जोशी यांनी सहभाग घेतला.

पोलिस कोठडी कशी असते?
सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी येथील पोलिस ठाण्याला भेट देऊन गुन्ह्यांची (एफआयआर) नोंद कशी होते. यासह तपास यंत्रणा कशा पद्धतीने राबविली जाते व आरोपींना न्यायालयात कसे सादर केले जाते, त्यासाठी कोणती पुरावे व कागदपत्रांची आवश्यकता असते, न्यायालयीन कोठडी व पोलिस कोठडी यामध्ये काय फरक असतो? पोलिस कोठडी कशी असते? आदींची माहिती घेऊन ठाण्यामधील शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.

कामकाज पाहण्याची मोठी उत्सुकता होती
यापूर्वी कधीही पोलिस ठाणे व न्यायालयाची पायरी चढली नव्हती. तेथील कामकाज पाहण्याची मोठी उत्सुकता होती, ती पूर्ण झाल्याचे प्रणव पांचाळ याने सांगितले. तसेच गणवेशामधील माननीय न्यायाधीश, वकील, बाजूच्या कठड्यात उभा असलेला आरोपी व तेथील कामकाज हे दृश्य केवळ सिनेमामध्ये पहिले होते. प्रत्यक्ष पहिल्याने संपूर्ण कामकाजाची माहिती मिळाली असे युवराज राठोड याने सांगितले. व शाळेतील पाठापेक्षा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यानंतर समजणे अधिक सहज व सोपे जाते, याचा प्रत्यत व अनुभव आला असे ओंकार वाघमारे याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.