जाफराबाद (जि.जालना) : जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील निमखेडा खुर्द आणि भोकरदन तालुक्यातील खापरखेडा गावातील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे संसदेत जालन्याचे (Jalna) प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.अनेकवेळा मुलामुलींचे पाय चिखलात फसतात, मुले घसरून तोल जाऊन चिखलात देखील पडतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्या-येण्याची वाट बिकट झाली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही काहीच मार्ग निघत नसल्याने निमखेडा व खापरखेडा येथील पालकांनी आपल्या पाल्यासह तहसील कार्यालयावर आज बुधवारी (ता.सहा) धडक मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन केले. (Students In Trouble, There Is No Good Road For Them In Jafrabad Taluka Of Jalna)
दरम्यान नायब तहसीलदार केशव डकले यांना पालक, विद्यार्थी (Student) व शिक्षकांनी निवेदन दिले. निमखेडा खुर्द आणि खापरखेडा गावातील विद्यार्थ्यांसाठी असलेली जिजामाता शाळेत जाण्यासाठी असणाऱ्या एकमेव रस्त्याची पावसाळ्यात दुरावस्था झाली आहे. त्यात दोनशे मीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल तयार होतो. हा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविलेला आहे. त्या शेतकऱ्यांची समजूत घालूनही शेतकरी ऐकत नसल्याने विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत आणि पायपीट करावी लागते. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ता मिळावा या मागणीकडे लक्ष्य वेधण्यासाठी विद्यार्थी, पालक यांनी तहसिलवर मोर्चा आणून ठिय्या आंदोलन केले.
या निवेदनावर प्रकाश पिंपळे, कृष्णा रोकडे, सुनील रोकडे, नारायण पिंपळे, विनायक पिंपळे, विठ्ठल तायडे, अरुण रोकडे, नंदकिशोर तिडके, उत्तम गाढे, विठ्ठल सपाटे, रामेश्वर लहाने, राजू रोकडे, शिवाजी दधरे, अशोक देवरे, शंकर सपाटे, शिवाजी पिंपळे, बाळासाहेब कोरके, रवींद्र पिंपळे, लक्ष्मण कोरडे, रामदास सपाटे, किशोर सपाटे, लक्ष्मण सपाटे, अनिल रोकडे, सुरेश दधरे, मदन बेडवाल, विठ्ठल सिंग बेडवाल, गणेश सिंगल ,संजय रोकडे, रामू रोकडे ,विलास रोकडे, अंकुश रोकडे, विवेक पिंपळे, अर्जुन रोकडे, अनिल रोकडे, अंबादास गोफणे, बापू केवट, प्रभू सपाटे, रामा सपाटे, विष्णू सपाटे, यश पिंपळे, शरद शिंदे ,परसराम चौधरी, शिवाजी फलके, भाऊसाहेब रोकडे, बाबासाहेब सपाटे, कैलास भालेराव, प्रकाश दधरे, महादू उगले, गजानन गोफने, एकनाथ सपाटे, समाधान भालेराव, पृथ्वीराज बेडवाल, राजेंद्र रोकडे, नारायण तिडके, अनिल रोकडे, पंढरीनाथ फलके, बाबासाहेब साखरे, कैलास फलके, रामेश्वर रोकडे, एकनाथ उबाळे, जगन रोकडे, परमेश्वर टाले, मनसुब फलके, राजू पिंपळे, अशोक तिडके, संजय पिंपळे, मंगलसिंग बेडवाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.