मदनसुरी (जि.लातूर) : मदनसुरी (ता.निलंगा, जि.लातूर) येथील सुपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्य असलेला शुभम संजय माने हा फ्रान्समध्ये इंटर्नशिप करण्यासाठी गेला होता. मात्र टाळेबंदीमुळे तेथे अडकला त्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर बुधवारी (ता.२७) तो पहाटे दिल्ली येथे पोचला. शुभम याचे पुणे येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी फ्रान्समधील ऑरिलॅक शहरातील ऑबर्गे डेला टूर या हॉटेलमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी ता.एक नोव्हेंबर २०१९ रोजी गेला होता. त्याची इंटर्नशिप संपत आले आणि फ्रान्समध्ये कडक टाळेबंदी जाहीर झाली.
त्यामुळे विमानसेवा पूर्ण बंद झाली. तब्बल दोन महिने तेथे अडकल्यामुळे त्याच्याकडचे पैसेही संपत आले होते. शुभमसाठी देश नवीनच घरची परिस्थिती मध्यमच. अशात सर्व कुटुंब काळजीत होते. त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांना भेटून याबाबत मदत करण्याची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विनंतीही केली. पण उत्तर काही मिळत नव्हते. अशातच शुभमचे वडील संजय माने यांनी विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्याशी संपर्क साधला आणि शुभमविषयी माहिती दिली.डॉ.कोहिनकर यांनी राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोलून शुभमला मदत करण्याची विनंती केली. सुरेश प्रभू यांनी फ्रान्स दूतावासाशी संपर्क साधला व शुभमला मदत करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
सुरेश प्रभू यांच्या फोनमुळे फ्रान्स दूतावासामधून शुभमला आवश्यक मदत करून लवकरात-लवकर निघणाऱ्या विमानात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले. त्याला वैयक्तिक मदतही केली. अखेर शुभम माने हा बुधवारी (ता.२७ ) पहाटे दिल्लीत पोचला असून त्याला तिथे एका हॉटेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विलगीकरण कक्षातील कालावधी संपल्यानंतर शुभम गावी येणार असल्याची माहिती त्याचे वडील संजय माने यांनी दिली. शुभम भारतात सुखरूप परतल्याने मदनसुरी येथील मित्र परिवार व कुटुंबातील सदस्यांत आंनदाचे वातावरण असून त्यानी केंद्र सरकार व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
कोरोनामुळे मला मायदेशी परतण्यात अडचण येत होती आणि जवळील सर्व पैसे संपले. त्यामुळे मी आणखी अडचणीत सापडलो. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीने व आदरणीय माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या प्रयत्ननाने आज सुखरूप मायदेशी परतलो आहे. त्यामुळे सर्वांचा आभारी आहे.
- शुभम माने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.