Success Story : दोन सख्ख्या भावंडांनी प्रतिकूल परिस्थितीत सीए पदाला घातली गवसणी

शिक्षणामुळे जीवनात क्रांती घडते. परिस्थिती कितीही बिकट आणि हलाखीची असली तरी शिक्षणातून श्रीमंती मिळवता येते, याची प्रचिती या दोन भावंडांनी आपल्या कृतिशील कार्यातून दाखवून दिली आहे.
success story of ankush and lahu journey of becoming ca education famil
success story of ankush and lahu journey of becoming ca education familSakal
Updated on

उमरगा : तालुक्यातील कोळसुर (गुंजोटी) येथील वैजनाथ गौंडगावे यांनी कुटुंबासह कामासाठी मुंबई गाठली. त्यानंतर त्यांच्या दोन मुलांनी देखील वडिलांच्या कष्टाचे चीज केले. दोन्ही भावडांनी प्रतिकूल परिस्थितीत मुंबईसारख्या महागड्या नगरात शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंटच्या (सीए) आहे.

शिक्षणामुळे जीवनात क्रांती घडते. परिस्थिती कितीही बिकट आणि हलाखीची असली तरी शिक्षणातून श्रीमंती मिळवता येते, याची प्रचिती या दोन भावंडांनी आपल्या कृतिशील कार्यातून दाखवून दिली आहे.

कोळसुर (गुंजोटी) सारख्या ग्रामीण भागातील वैजनाथ गौंडगावे यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले. कुटुंबात अगदी जेमतेम शेती असल्याने उदरनिर्वाहासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे वयाच्या २७ व्या वर्षी वैजनाथ यांनी कामासाठी मुंबई गाठली. तेथे घर, दुकानाचे रंगकाम (पेंटर) करण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला.

मेहनतीचे व कठीण काम करत त्यांनी या व्यवसायाला लक्ष्मी समजून अखंडपणे काम सुरू ठेवले. उदरनिर्वाहासाठी जेमतेम उत्पन्न सुरू झाले खरे पण मुलांच्या शिक्षणाची चिंता होती. तरीही वैजनाथ यांनी मुलांना शिक्षित करण्याचा निर्णय घेतला. आणि दोन्ही मुलांनीही वडिलांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन शिक्षणात भरारी घेतली.

वैजनाथ यांचा थोरला मुलगा अंकुश याचे पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेत झाले. सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण प्रेरणा मराठी स्कूलमध्ये घेतले. बी.कॉम.ची पदवी के.जे. सोमैया कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स येथून पूर्ण केली,

तर मुंबई विद्यापीठातून एम.कॉम.चे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर सी.ए.च्या परीक्षेत चांगले गुण घेतले. अंकुशला सध्या मुंबईच्या डेलोइट हस्कीन्स आणि सेल्स एलएलपी या कंपनीत वर्षाला तेरा लाख रुपयांचे पॅकेज आहे.

वैजनाथ यांचा धाकटा मुलगा लहू याचे पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेत झाले. चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण प्रेरणा मराठी स्कूलमध्ये झाले. रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज ऑफ आर्टस् आणि कॉमर्स येथे येथे बी.कॉम.ची पदवी घेतली. त्यानंतर सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाला.

सध्या तो ग्रॅंट थॉर्नटन इंडिया कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतोय. एक-दोन महिन्यांत तो देखील चांगल्या कंपनीत पॅकेज मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

शिक्षणामुळे जीवनात आमूलाग्र बदल होतो. वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतून आम्हा भावंडांना शिक्षणासाठी मदतीचा हात दिला. त्याची जाणीव ठेवून शिक्षणातून वैभव निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक पाल्याने जाणीव ठेवली तर जीवनात कोणत्याच बाबींची कमतरता भासणार नाही.

— अंकुश गौंडगावे, सीए.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.