Ajanta Verul Caves: वेरूळ-अजिंठा महोत्सवाची संभाजीनगरात जय्यत तयारी ; दोन फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांची मेजवानी

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पर्यटनवृद्धी व संगीताचा अभिजात वारसा पोचविणाऱ्या या महोत्सवाची शहरवासीयांनाही उत्सुकता आहे.

महोत्सवानिमित्त पूर्वरंग कार्यक्रम व हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आले होते. यामुळे शहरात महोत्सवाची उत्सुकता शिगेला पोचली असून महोत्सवात यंदा जास्त आसन क्षमता राहील. मध्यंतरी खंड पडलेल्या वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे हे सलग दुसरे वर्ष आहे. यंदा सोनेरी महल परिसरातील २, ३ आणि ४ फेब्रुवारीरोजी महोत्सव होणार आहे, अशी माहिती वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समितीने दिली.

sambhaji nagar
Ajanta Caves: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांची तोबा गर्दी! अधिक मास, रविवारच्या सुट्टीचा आनंद

महोत्सवात डॉ. संध्या पुरेचा, पंडित अनुराधा पाल, राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, अमन आणि बयान अली बंगश, कैलाश खेर, उर्मिला कानेटकर, वैदेही परशुरामी, कुमार शर्मा आणि श्रेया घोषाल आधी कलाकार येणार असून भरतनाट्यम, इन्स्ट्रुमेंटल फ्युजन, क्लासिकल नृत्य, सुफी आदींचा समावेश आहे. सोनेरी मंच बॅक ड्रॉपला ठेवत यंदाचा रंगमंच सजतोय. त्याचप्रमाणे वाढीव आसन व्यवस्था, ७० वर स्टॉल आणि सर्व मूलभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.

महोत्सवाचा भाग म्हणून शहरातील विविध भागात पाच पूर्वरंग कार्यक्रम आणि तीन हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला शहरातील नागरिक, अभ्यासक आणि इतिहास व सांस्कृतिक प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

महोत्सवाला प्रतिसाद बघता आसनव्यवस्था ६,५०० वरून ८,५०० इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक महोत्सव बघू शकतील. सोनेरी महलच्या बाहेरसुद्धा प्रेक्षकांसाठी भव्य स्क्रीन लावण्यात येईल.

-विजय जाधव,

उपसंचालक, पर्यटन संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.