सोनपेठ (जि.परभणी) : आठ वर्षांपासून झालेल्या कर्करोगाला कंटाळून एका वयोवृद्ध महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २२) कोठाळा (ता. सोनपेठ) येथे घडली.
कोठाळा (ता.जिंतूर, जि.परभणी) येथील बबिता लुलाजी ताटे (वय ६५) या महिलेला आठ वर्षांपासून कर्करोग झाला होता. त्याचा त्रास असहाय्य झाल्यामुळे सदर महिलेने शनिवारी (ता. २२) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावालगत असणाऱ्या तळ्यावर शौचाला जाण्याच्या निमित्ताने गेली, ती रात्रभर घरी परत आलीच नाही. गावात व इतर ठिकाणी चौकशी केली असता रविवारी (ता. २३) सकाळी अकरा वाजता तळ्याच्या शेजारी संबधित महिलेची चप्पल, बॅटरी तसेच इतर वस्तू आढळून आल्या.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद
या बाबत सुधाकर ताटे यांनी सोनपेठ पोलिसांना माहिती कळवताच सोनपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबधित महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. बबिता ताटे यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली, असे मुलागा सुधाकर ताटे यांनी सांगितले. त्यांच्या माहितीवरून सोनपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास जमादार आडे हे करीत आहेत.
हेही वाचा -‘कोरोना’चा कशावर झाला परिणाम, ते वाचाच
हेही वाचा ....
दोन महिन्यांचे मृत अर्भक सापडले
परभणी : शहरातील अजीजीयानगर, संजयनगर परिसरातील रेल्वेपटरीजवळ रविवारी (ता.२३) सकाळी अकराच्या सुमारास अंदाजे दोन महिन्यांचे मृत पुरुष जातीचे अर्भक आढळले. या बाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अजीजीयानगर, संजयनगरातील रेल्वेपटरीजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीस छोटेचे अर्भक दिसले. त्यांनी तातडीने कोतवाली पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे, व्ही. एस. अरसेवार, कर्मचारी संभाजी पंचांगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे रेल्वेपटरीजवळ त्यांना एक - दोन महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक एका पॉलिथिनमध्ये आढळले. तातडीने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा
जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी शेख रफीक शेख युसूफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संभाजी पंचांगे हे करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळास सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही भेट दिली. दरम्यान, या बाबत काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही ‘सकाळ’ शी बोलताना ते म्हणाले.
हेही वाचा ....
रेल्वेसमोर मारून मजुराची आत्महत्या
मानवत (जि.परभणी) : कुंभारी (ता. परभणी) येथे जेसीबीवर मशीनवर हेल्पर काम करणाऱ्या ओरिसा राज्यातील एका २१वर्षीय मजुराने देवलगाव आवचार (ता. मानवत) शिवारात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी
रविवारी (ता. २३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडीस आली.
विक्रम रमेश बिस्वाल (रा. केसपूर, ता. बाणपूर, जि. खुरधा) हा ओरिसा राज्यातील युवक कुभांरी (ता. परभणी) येथे मजुरी कामासाठी आला होता. तो शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना डोके दुखत असल्याचे सांगून परभणी येथे उपचार करण्यासाठी निघून गेला. पण, परत आला नाही. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बिस्वाल यांच्या मृतदेह देवलगाव आवचार शिवारात रेल्वे पटरीवर आढळून आला. या प्रकरणाचा तपास डी. बी. मुरमरे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.