आम्हाला मनसोक्त खेळू द्या

सध्या टीव्ही आणि मोबाईलचा अतिरेक वाढला आहे. यात अनेक मुलांना मैदानी खेळ काय आहे हेच माहिती नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळ हा महत्त्वाचा घटक आहे.
Childrens
ChildrensSakal
Updated on

सध्या टीव्ही आणि मोबाईलचा अतिरेक वाढला आहे. यात अनेक मुलांना मैदानी खेळ काय आहे हेच माहिती नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळ हा महत्त्वाचा घटक आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही. खेळामुळे मुले शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होतात. यामुळे पालकांनी मुलांना प्रोत्साहित करत मनसोक्त खेळू द्यायला हवे.

लहान मुलांच्या आरोग्यासाठी मैदानी खेळावर बोलताना शासकीय कर्करोग रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख म्हणतात, की स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या पुस्तकी शिक्षणाला फार महत्त्व दिले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांची एकमेव योग्यता पारखण्याचा मापदंड म्हणजे परीक्षेत मिळणारे गुण.

अशी परिस्थिती आज बहुतेक घरात असल्यामुळे मुलांना शाळा व क्लास, व्हिडीओ गेम, बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर, यात संगणक, मोबाईल या सर्वांमध्ये तो मैदानी खेळ खेळणे पार विसरूनच गेला आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे. यामुळे पालकांनी मुलांना टीव्ही आणि मोबाईल फोनचा वापर करण्यावर निर्बंध घालावे आणि मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

सुप्त गुण होतात विकसित

मैदानी खेळांमधून वेळेचे नियोजन, समुहात काम करण्याची क्षमता, स्वत:च्या व इतरांच्या भावना समजणे, इतरांशी संवाद साधता येणे, नेतृत्वगुण असणे, ताणतणाव हाताळता येणे यासारखी अनेक जीवन कौशल्ये मुलांच्या आपोआपच नकळत अंगी येतात.

तसेच जिद्द, चिकाटी, मैत्री, विश्वबंधुत्वाची भावना, खिलाडूवृत्ती यासारखे गुण मैदानावर खेळ खेळताना विकसित होत असतात. याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकसित करणारे अनेक इतर सामाजिक गुणदेखील विद्यार्थी नकळत आत्मसात करतात.

मैदानी खेळांमुळे मुले शारीरिक आणि मानसिक, बौद्धिकदृष्ट्या जास्त अॅक्टीव्ह राहतात. खेळामुळे मुलांची शारीरिक, पंचेंद्रियांची, सामाजिक आणि भावनिक प्रगती होते. त्यामुळे लहान मुलांना चालण्या व पाळण्याच्या वयापासूनच मैदानी खेळ हे शिकविणे खूप गरजेचे आहे.

- डॉ. सुनील देशमुख, विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.

शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळाचे मोठे महत्त्व आहे. मैदानी खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात. मैदानी खेळामुळे मुलांमधील धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होण्यास मदत होते. नियमित मैदानी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. विशेष म्हणजे, मुले मैदानवर आली तर मोबाईलपासून दूर राहतील.

- डॉ. संदीप जगताप, क्रीडा संचालक, विद्यापीठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.